श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. ...
एक लाखाची खंडणी मागणारा कथित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे ऊर्फ चिंटू महाराज अद्यापही मौदा पालिसांच्या हाती लागला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो चक्क शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद या ...
मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून बरखास्तीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नासुप्रचे प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहे. ...
तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष! ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानामध्ये शासनाने वाढ केली. परंतु ही वाढ शाळेच्या पटसंख्येवर आधारित असल्याने कमी पटाच्या शाळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शाळांना आपल्या पायाभूत गरजासुद्धा भागविणे कठीण जाणार आहे. ...
संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे. ...
बोगस नोकर भरतीचे रॅकेट चालवून देशातील अनेक तरुणांकडून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली आहे. ...
स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई दुप्पट करण्यात आली. ...
राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...