शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

....म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध करणार : विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 17:27 IST

...अन्यथा १७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आंदोलन करणार

ठळक मुद्देसारथी बैठक सोडली तर राज्य सरकारचे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष

पुणे: महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुुरू असलेले आरक्षण जातेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आणि म्हणून उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना काळे कपडे घालून,मशाली पेटवून विरोध करणार असल्याचेे शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

आमदार मेटे म्हणाले,मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे असून त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे चव्हाण यांना या पदावरून बाजूला करण्यात यावे अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी जर मराठा समाज बांधवांचा आरक्षणाविषयीचा उद्याचा आवाज ऐकला नाही तर १७ ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल.आणि जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले.

शनिवारी ( दि. 8) पुण्यात आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

मेटे म्हणाले, सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशोक चव्हाण यांच्याकडील जबाबदारी काढून ती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात यावी यासाठी राज्यातील १३ मराठा संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकवले पाहिजे.त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी केस टिकवली त्यांना केस लढवू दिली जात नाही. उद्या नाही ऐकले तर १७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मशाली पेटवून,जागरण गोंधळ घालून आम्ही आंदोलन करणार  असल्याचा इशारा मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने प्रश्न विचारावे. समाजाला मराठा आरक्षणाबाबत एक बैठक घेऊन माहिती देण्यात यावी,असेही मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :PuneपुणेVinayak Meteविनायक मेटेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकार