शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 9:38 AM

Maharashtra Election Result 2019: एमआयएमचा महायुतीला फायदा; महाआघाडीला फटका

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून अब की बार २०० पारची घोषणा देण्यात आली होती. मात्र महाआघाडीनं अनेक मतदारसंघांमध्ये चांगली लढत दिली. त्यामुळे महायुतीची गाडी १६१ वर अडली. महाआघाडीला अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा फटका बसला. अन्यथा त्यांच्या जागांचा आकडा १२०च्या आसपास पोहोचला असता. असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनं राज्यात केवळ दोनच जागा जिंकल्या. मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघांमध्ये एमआयएमनं विजय मिळवला. मात्र एमआयएमच्या उमेदवारांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला नऊ मतदारसंघांमध्ये फटका बसला. याचा थेट फायदा महायुतीला झाला. एमआयएमला मिळालेल्या मतांमुळे सर्वात मोठा फटका चारवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या नसीम खान यांना बसला. मुंबईतल्या चांदिवली मतदारसंघात खान यांचा केवळ ४०९ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी झाले. तर एमआयएमच्या मोहम्मद इम्रान कुरेशींना १,१६७ मतं मिळाली. मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी बाबा शेळके भाजपाचे उमेदवार विकास कुंभारेंकडून ४,००८ मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात एमआयएमच्या अब्दुल शरीक पटेल यांनी ८,५६५ मतं घेतली. मुस्लिम समाज हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार समजला जातो. मात्र अनेक ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांमुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं. त्यामुळे शिवसेना, भाजपाला फायदा झाला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनं महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता, तर विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, अशी आकडेवारी सांगते. वंचित आणि एमआयएममुळे महाआघाडीला २३ जागांवर फटका बसला, असं ट्विट निकालाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. निवडणुकीत महायुतीला १६१ जागा मिळाल्या आहेत. वंचित, एमआयएमनं महाआघाडीसोबत निवडणुकीत लढवली असती, तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाली असती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी