IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या येलो जर्सीत सुरुवातीच्या अपयशानंतर दमदार कमबॅक करत हंगामातील पहिलं शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसन याने ICC चा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ब्लू जर्सीत मार्च महिना गाजवणाऱ्या संजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कारासाठी भाराताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहही शर्यतीत होता. पण संजू समोर तो फिका ठरला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार जिंकणारा संजू केरळचा पहिला क्रिकेटर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC वर्ल्ड कप स्पर्धेत लेट एन्ट्री अन् मोठा धमाका
ICC T20 वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेआधी संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या गेम प्लॅनचा महत्त्वपूर्ण भाग होता. पण घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो सातत्याने अपयशी ठरला. परिणामी त्याच्यावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात बाकावर बसण्याची वेळ आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ 'जर-तर'च्या समीकरणात अडकल्यावर संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर डाव खेळला. त्याने मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवत टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
वेस्टइंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शो
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करो वा मरोची लढत झालेल्या वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने ९७ धावांची स्फोटक खेळी करत संघाला सेमीफायलमध्ये नेले. इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्येही त्याने ८९ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलमध्ये त्याने ८९ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. या तीन सामन्यातील खेळीच्या जोरावर लेट एन्ट्री मारून तो मालिकावीर ठरला. आता आयसीसी पुरस्काराच्या यादीतही त्याने बाजी मारली आहे.
ICC पुरस्कार जिंकणारा केरळचा पहिला क्रिकेटर
संजू सॅमसन याने मार्चमधील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. ICC चा पुरस्कार जिंकणारा तो केरळचा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. याआधी भारीतीय संघातील अनेक खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला आहे. पण केरळच्या क्रिकेटरला हा पुरस्कार पटकवता आला नव्हता.
Web Summary : Sanju Samson wins ICC's 'Player of the Month' award after a stellar performance, surpassing Jasprit Bumrah. He is the first cricketer from Kerala to achieve this honor, marking a significant milestone in his career after a comeback.
Web Summary : संजू सैमसन ने शानदार प्रदर्शन के बाद आईसीसी का 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जीता, जसप्रीत बुमराह को पछाड़ा। वह यह सम्मान पाने वाले केरल के पहले क्रिकेटर हैं, जो वापसी के बाद उनके करियर में एक महत्वपूर्ण मील का पत्थर है।