शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:33 IST

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. "नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'देशद्रोही' असे संबोधले. ते पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी राहुल गांधी यांनी, "अमेरिकेसोबत झालेला नवा व्यापार करार हा देशातील लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे नुकसान करणारा आहे. यामुले रोजगाराचे प्रचंड संकट निर्माण होईल. तसेच 'SIR' (State Identity Register) मधून मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे हटवणे असंवैधानिक असून काँग्रेसचे सरकार आल्यास ही नावे पुन्हा जोडली जातील, असे आश्वासन दिले.

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत -राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात. ५६ इंचाच्या छातीचा दावा हा केवळ विनोद असून त्यांनी तर देशच विकला आहे." दरम्यान त्यांनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधांवरूनही सरकारवर हल्ला चढवला. "सरकार सर्व कंत्राटे अदानींनाच देते, कारण अदानी सरकारला पैसा आणि पाठबळ देतात. माध्यमही चालवतात. खरे तर, अदानी यांच्या कंपनीचे नाव 'मोदानी' असायला हवे," असे ते म्हणाले. तसेच, अमेरिकेला या व्यवहारांची कल्पना असून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे करिअर संपवण्याची भाषा केली तरी पंतप्रधान शांत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

"ट्रम्प यांना यस सर-यस सर करतात मोद - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदींवर ट्रम्प यांचे पूर्ण नियंत्रण आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसाठी कृषी क्षेत्र खुले केले आहे. त्यांनी अमेरिकेसोबत तेल खरेदीचा करार केला आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की, इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करायचे असेल, तर आधी त्यांना विचारले जाईल." एवढेच नाही तर, नरेंद्र मोदी ट्रम्प यांना केवळ ‘यस सर, यस सर’ म्हणतात. तसेच, ट्रम्प यांच्यासोबत करार  करण्यात आला आहे की, भारत अमेरिकेकडून दरवर्षी ९ लाख कोटी रुपयांचा माल खरेदी करेल. राहुल गांधी म्हणाले की, या व्यापार कराराचे स्वरूप स्पष्टपणे दाखवते की पंतप्रधान मोदी देशद्रोही आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi avoids eye contact, obeys Trump: Rahul Gandhi's scathing attack.

Web Summary : Rahul Gandhi accuses Modi of being a 'traitor,' alleging he avoids eye contact and prioritizes US interests over Indian businesses, especially with Trump's influence. He claims Modi's deals favor American trade at India's expense.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2026congressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी