शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:53 IST

Volkswagen Taigun:कारमध्ये आधुनिक 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

Volkswagen Taigun: जर्मन कार कंपनी Volkswagen ने जवळपास पाच वर्षांनंतर आपल्या लोकप्रिय SUV Taigun चे फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे बाजारात सादर केले आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹10.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या SUV सोबत 75% पर्यंतची बायबॅक गॅरंटी देत ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.

75% बायबॅक ऑफर...

Volkswagen च्या “Assured Buyback” योजनेअंतर्गत 3 वर्षे किंवा 30,000 किमी वापरानंतर कार परत केल्यास एक्स-शोरूम किमतीच्या 75% पर्यंत रक्कम परत मिळेल.  ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे. भारतीय कार बाजारात इतक्या मोठ्या बायबॅक व्हॅल्यूची ऑफर क्वचितच पाहायला मिळते.

डिझाइनमध्ये प्रीमियम टच

नवीन Taigun मध्ये मोठे बदल नसले तरी डिझाइन अधिक आकर्षक करण्यात आले आहे. फ्रंटला स्लिम ग्रिल आणि फुल-विड्थ LED लाईट बार, इल्यूमिनेटेड Volkswagen लोगो, पियानो ब्लॅक फिनिश बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स मिळतील. तर, मागील बाजूस नवीन LED टेललॅम्प्स, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, वेलकम आणि गुडबाय अ‍ॅनिमेशन मिळेल.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Taigun फेसलिफ्टमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिले 1.0L TSI पेट्रोल इंजिन, जे 114 bhp पॉवर, 178 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल / 8-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन पर्याय मिळतील. तर, दुसरे 1.5L TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 148 bhp पॉवर, 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात तुम्हाला 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल. 

केबिन आणि फीचर्समध्ये अपग्रेड

नवीन Taigun मध्ये प्रीमियम इंटीरियरसह अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुम्हाला 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम (AI बेस्ड फीचर्ससह), पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स...असे एकूण 40 पेक्षा अधिक फीचर्स मिळतील.

सुरक्षेतही मजबूत

सुरक्षेच्या दृष्टीने Taigun फेसलिफ्टमध्ये 6 एअरबॅग्स, ABS + EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX माउंट्स मिळेल. कंपनीनुसार, या SUV ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. या कारवर तुम्हाला 4 वर्षे किंवा 1 लाख किमी वॉरंटी, 4 वर्षे रोडसाइड असिस्टन्स आणि 3 फ्री सर्व्हिस मिळतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Volkswagen Taigun Facelift Launched with 75% Buyback Guarantee!

Web Summary : Volkswagen launched the Taigun facelift with an attractive 75% buyback offer. The SUV features design upgrades, two engine options, premium interiors with 40+ features, and enhanced safety with a 5-star rating. Prices start at ₹10.99 lakh.
टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग