शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:56 IST

Lok Sabha seat increase: केंद्र सरकारने घटनेतील संभाव्य दुरुस्ती आधी खासदारांना विधेयकाचा मसुदा दिला आहे. केंद्र सरकारचे हे प्रस्तावित विधेयक लागू झाल्यानंतर लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार आहे. 

Delimitation of constituencies: केंद्र सरकारकडूनलोकसभा सदस्यांच्या जागा वाढवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्राने लोकसभेतील खासदारांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आला आहे. यामुळे प्रलंबित असलेले महिला आरक्षण कायदा लागू करणे आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे विशेष अधिवेशन बोलण्यात आले आहे. त्या काळात घटना दुरुस्ती विधेयके मंजूर करण्याचा विचार सरकार करत आहे. 

कोणत्या जनगणनेचा आधार घेणार?

केंद्र सरकारने संसद आणि राज्याच्या विधानसभांसह महिला आरक्षणांशी संबंधित ३३ टक्के आरक्षण कायद्यात दु्रुस्ती करण्यासाठी आणि २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले आहे. 

केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार लोकसभेच्या ८१५ जागा या राज्यांसाठी असणार आहेत, तर ३५ जागा केंद्र शासित प्रदेशांसाठी असणार आहे. या जागांची एकूण बेरीज ८५० इतकी होते. वाढीव खासदार संख्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे. 

विरोधक मतदार पुनर्रचनेला आव्हान देणार

केंद्र सरकारकडून मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तर विरोधी पक्षांमध्ये याला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर ही पुनर्रचना केली जात असल्याचा मुद्दा विरोधक मांडणार आहे. आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक या पक्षांसह इतर पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचनेसाठी २०२१ च्या जनगणनेचा आधार घेतला जावा, अशी मागणी केली आहे. 

महाराष्ट्रातील खासदारांची संख्या वाढणार?

लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन कायदा आणि प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांचा आकडाही वाढणार आहे. महाराष्ट्रातून सध्या ४८ खासदार लोकसभेत जातात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या ७२ इतकी होईल म्हणजे महाराष्ट्रातून ७२ खासदार लोकसभेत जातील अशी शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lok Sabha Seats to Increase to 850; Maharashtra's Share?

Web Summary : Lok Sabha seats may rise to 850, potentially increasing Maharashtra's representation from 48 to 72. Delimitation based on 2011 census is proposed, facing opposition demanding 2021 data. The change could take effect by 2029 elections.
टॅग्स :lok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाParliamentसंसदMember of parliamentखासदार