IPL 2026, CSK vs KKR, Kartik Tyagi bamboozles Sanju Samson : चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने पुन्हा एकदा एक मोठी खेळी करण्याचे संकेत दिले होते. पण यंदाच्या हंगामातील पहिला शतकवीर ठरलेल्या संजूला युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याने ताशी १४८.१ कि.मी. वेगाने टाकलेल्या कमालीच्या इनस्विंगवर संजूचा डाव अर्धशतका आधीच मोडला. संजू सॅमसन एकदा फॉर्ममध्ये आला की त्याला रोखणं मुश्कील असते. तेच चित्र चेपॉकच्या मैदानवारही निर्माण झाले होते. पण कार्तिक त्यागीने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत KKR च्या संघाला मोठा दिलासा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेगासह अप्रतिम इनस्विंग! कार्तिक त्यागीसमोर संजू चारीमुंड्याचित
चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील १२ व्या षटकात कार्तिक त्यागी आपले दुसरे षटक घेऊन आला. त्याच्या पहिल्याच स्लोवर चेंडूवर संजू सॅमसन याने उत्तुंग षटकार मारत ४८ धावांवर पोहचला. पुढच्याच चेंडूवर कार्तिक त्यागीनं कमालीच्या इनस्विंगवर संजू सॅमसनला चारीमुंड्याचित करत लेग स्टंप उडवली. संजू सॅमसन याने कोलकाता विरुद्ध ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १५० च्या स्ट्राईक रेटनं ४८ धावा केल्या.
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
संजूनं या गोलंदाजाला दिला होता 'ब्रेट ली'चा टॅग
कार्तिक त्यागी हा आयपीएलमध्ये आपल्या वेगवानं माऱ्याने प्रभावित करणाऱ्या युवा गोलंदाजांपैकी एक आहे. तो संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली खेळतानाही दिसला आहे. २०२१ च्या हंगामात पंजाब किंग्सविरुद्ध मॅच विनिंग स्पेल टाकल्यावर संजूनं या युवा गोलंदाजाला ब्रेट लीची उपमा दिली होती. आज दोघंही वेगवेगळ्या फ्रँयाचझीकडून खेळताना समोरासमोर आले. यावेळी कार्तिक त्याने संजूसमोर हवा केल्याचे पाहायला मिळाले.
त्यागीनं 'बेबी एबी'ला स्लोव्हर चेंडूवर फसवलं
संजू सॅमसन याच्या महत्त्वपूर्ण विकेटशिवाय कार्तिक त्यागी याने डेवॉल्ड ब्रेविसलाहीही अर्धशतकापासून रोखलं. ब्रेविसला अप्रतिम स्लोव्हर त्याने ब्रेविसच्या खेळीला ४१ धावांवर ब्रेक लावला. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. कार्तिकने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात ३५ धावा खर्च करत दोन विकेट्स घेतल्या.
Web Summary : Kartik Tyagi dismissed Sanju Samson with a brilliant in-swinging delivery at 148.1 kmph after Samson hit him for a six. Tyagi also dismissed Dewald Brevis, showcasing his impressive bowling skills and providing crucial breakthroughs for KKR.
Web Summary : कार्तिक त्यागी ने संजू सैमसन को 148.1 किमी प्रति घंटे की शानदार इन-स्विंग गेंद पर आउट किया, इससे पहले सैमसन ने उन्हें छक्का मारा था। त्यागी ने डेवाल्ड ब्रेविस को भी आउट किया, जिससे केकेआर को महत्वपूर्ण सफलताएं मिलीं।