IPL 2026: KKR's Winless Run In IPL 2026 Continues, Slumps To 32-Run Loss Against CSK : चेन्नईच्या चेपॉकच्या घरच्या मैदानात नूर अहमदच्या फिरकीतील जादू आणि पॉवर प्लेमध्ये अंशुल कंबोज आणि खलील अहमद यांच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. धावांचा बचाव करताना चेन्नई सुपर किंग्सने क्षेत्ररक्षणात काही मोठ्या चुका केल्या. चौथ्या षटकात ऋतुराज गायकवाडनं सुनील नरेनचा सोपा झेल सोडला. ब्रेविसनं आठव्या षटकात अंगकृष रंघवंशीला जीवनदान दिले. १० व्या षटकात सरफराज खान याने अजिंक्य रहाणेचा झेल सोडून यात भर घातली. पण या तिघांतील एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे चुकांवर चुका करूनही शेवटी चेन्नई सुपर किंग्सने विजयाचा डाव साधला. दुसऱ्या बाजूला कोलकाता नाईट रायडर्सची विजयाची पाटी पाच सामन्यानंतरही कोरीच राहिली. २०२४ नंतर पहिल्यांदाच चेन्नईनं IPL मध्ये सलग दोन विजय नोंदवले आहेत.
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने संजू सॅमसन ४८ (३२), आयुष म्हात्रे ३८ (१७) आणि डेवॉल्ड ब्रेविसच्या ४१ (२९) खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ बाद १९२ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पुन्हा कमी पडला.
Web Summary : CSK secured its second IPL 2026 victory despite fielding errors. KKR's losing streak continued after suffering a 32-run defeat. Excellent bowling from Noor Ahmad, Anshul Kamboj, and Khaleel Ahmed helped CSK defend their score. KKR's struggles continue, remaining winless after five games.
Web Summary : सीएसके ने फील्डिंग में गलतियों के बावजूद अपना दूसरा आईपीएल 2026 जीत दर्ज की। केकेआर की हार का सिलसिला 32 रन से हार के बाद भी जारी रहा। नूर अहमद, अंशुल कंबोज और खलील अहमद की शानदार गेंदबाजी ने सीएसके को अपने स्कोर का बचाव करने में मदद की। केकेआर का संघर्ष जारी है, पांच मैचों के बाद भी जीत से वंचित है।