By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:33 IST
1 / 7इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या उच्चस्तरीय शांतता चर्चेमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा जागतिक केंद्रस्थानी आला आहे. याच दरम्यान पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची आणि विशेषतः अमेरिकेच्या कर्जाची चर्चा रंगली आहे.2 / 7पाकिस्तानवर अमेरिकेचे थेट द्विपक्षीय कर्ज हे त्यांच्या एकूण बाह्य कर्जाच्या तुलनेत कमी आहे. मात्र, अमेरिकन वित्तीय प्रणाली आणि संबंधित संस्थांशी जोडलेली देणी ७० अब्ज डॉलर पेक्षा जास्त असल्याचे अंदाज वर्तवले जातात.3 / 7अमेरिका हा 'पॅरिस क्लब'चा महत्त्वाचा सदस्य आहे. हा गट आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना कर्ज देतो. पाकिस्तानवर या गटाचे एकत्रितपणे सुमारे ७.५४ अब्ज डॉलर इतके कर्ज आहे.4 / 7२०२५च्या अखेरपर्यंत पाकिस्तानचे एकूण बाह्य कर्ज आणि देणी सुमारे १३८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहेत. यात विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कर्जाचा समावेश आहे.5 / 7पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या एकूण बाह्य कर्जापैकी ५८% हिस्सा अमेरिकन डॉलरमध्ये आहे. जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा पाकिस्तानवर कर्ज परतफेडीचा भार थेट वाढतो.6 / 7अमेरिका जरी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज देणाऱ्यांमध्ये चीन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांचा समावेश आहे.7 / 7कर्जाच्या पलीकडे अमेरिकेने पाकिस्तानला मोठी आर्थिक मदतही केली आहे. १९४८ ते २०१६ या काळात अमेरिकेने पाकिस्तानला सुमारे ७८.३ अब्ज डॉलरची आर्थिक मदत पुरवली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकन डॉलर आणि तिथल्या वित्तीय संस्थांचा मोठा प्रभाव आहे, जो पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांना सतत प्रभावित करत असतो.