शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:36 IST

अमेरिकेत कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेशातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेशातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला आहे. २६ वर्षांचा हा तरुण आपल्या वाढदिवशी म्हणजेच शनिवार ११ एप्रिल रोजी मित्रांसोबत फिरायला गेला होता, मात्र एका धबधब्यावर झालेल्या दुर्घटनेत त्याचा जीव गेला. पाण्यातील धोकादायक परिस्थितीमुळे हा अपघात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सिंगिरेड्डी साई श्रीहरीकृष्ण असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो विजयनगरम जिल्ह्यातील पिरीडी गावाचा रहिवासी होता.

श्रीहरीकृष्ण हा मूळचा विजयनगरम जिल्ह्यातील पिरीडी गावचा होता. अमेरिकेत मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर त्याने अलीकडेच सेंट लुईस येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वीच ही नोकरी मिळाली होती आणि तो आपल्या करिअरच्या सुरुवातीमुळे खूप आनंदी होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

वाढदिवशीच झाला घात

ही घटना शनिवारी घडली, जेव्हा श्रीहरीकृष्णचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो आपल्या मित्रांसह कॅलिफोर्नियातील एका धबधब्यावर गेला होता. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोहण्याची आवड होती आणि तो आनंदाने पाण्यात उतरला. मात्र काही मिनिटांतच परिस्थिती बिघडली आणि तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला यश आलं नाही. त्यानंतर आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह बाहेर काढला.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

या तरुण इंजिनिअरच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वडील सिंगिरेड्डी श्रीनिवास राव आणि आई रामादेवी असा परिवार आहे. आता त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. TDP आमदार आर.व्ही.एस.के.के. रंगाराव यांनी आंध्र प्रदेशचे मंत्री कोंडापल्ली श्रीनिवास यांच्याशी चर्चा करून मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्याची विनंती केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Indian Engineer Dies in US on His Birthday

Web Summary : An Andhra Pradesh software engineer died in California on his birthday. The 26-year-old drowned in a waterfall accident while celebrating with friends. His family is devastated, and efforts are underway to bring his body home.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDeathमृत्यू