शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:36 IST

Nitish Kumar resignation: नितीश कुमार यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. ते दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. 

Nitish Kumar Latest News Marathi: बिहार सरकारमधील नितीश कुमारांचे काम आज थांबले. गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. १४ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा सोपवला. मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता थांबतोय, नव्या सरकार माझा भक्कम पाठिंबा राहील, अशा भावना नितीश कुमार यांनी व्यक्त केल्या. 

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सोपवल्यानंतर एक्सवर पोस्ट लिहून त्यांची भूमिका मांडली. 

नितीश कुमार म्हणाले, सर्वच समाज घटकांचा विकास केला

एक्सवरील पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, "तुम्हाला माहिती आहे की, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्यांदा राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हापासून कायद्याचे राज्य आणि आम्ही विकास कामे करत आहोत. सरकारने सुरुवातीपासूनच सर्व समाज घटकांचा विकास केला, मग तो हिंदू असो, मुस्लीम असो, उच्च वर्णीय असो किंवा मागास घटकातील असो, अति मागास प्रवर्गातील असो, सर्वांसाठीच काम केले. प्रत्येक क्षेत्रात काम झाले आहे, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो, रस्ते निर्माण, वीज पुरवठा, कृषी असो. महिला आणि तरुण वर्गासाठीही खूप काम केलं गेलं आहे."

"बिहार देशाच्या विकासात योगदान देईल"

नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, "गेल्या काही काळापासून कामाचा वेग वाढवला आहे. पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजे २०२५ ते २०३० या काळासाठी ७ निर्धार करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण होईल आणि त्यामुळे बिहार आणखी पुढे जाईल."

"बिहारच्या विकासामध्ये केंद्र सरकारचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. बिहार आणखी वेगाने विकसित होत जाईल आणि देशातील वरच्या राज्याच्या यादीत सामील होईल. त्याचबरोबर देशाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान देईल", असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

ठरवलं की राजीनामा द्यायचा

नितीश कुमार यांनी पुढे म्हटले आहे की, "आम्ही बिहारच्या लोकांसाठी खूप सारं काम केलं आहे. इतक्या दिवसांपासून आणि निरंतर लोकांची सेवा करत आलो आहोत. मी ठरवलं होतं की, आता मुख्यमंत्री पद सोडून द्यायचे आणि आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यपालाची भेट घेऊन त्यांना माजा राजीनामा सोपवला. आता नवे सरकार इथले काम बघेल. नव्या सरकारला माझा पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील. यापुढे खूप चांगले काम होत राहील आणि बिहार खूप पुढे जाईल", अशा भावना नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar Resigns as Chief Minister, Pledges Support to New Government

Web Summary : Nitish Kumar resigned as Chief Minister, citing his desire to step down after years of service. He highlighted his government's work across all communities and sectors, expressing confidence in Bihar's future development with continued central support and pledged his support to the new government.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडPoliticsराजकारण