मध्य पूर्व आशियातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साआर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पश्चिम आशियातील सध्य स्थिती आणि त्यासंदर्भातील विविध पैलूंवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात स्वतः एस. जयशंकर यांनी 'X' वर पोस्ट करून माहिती दिली.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साआर यांनी जयशंकर यांच्याशी लेबनॉन, इराण आणि विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी साआर यांनी इस्लामाबाद चर्चेत अमेरिकेने मांडलेल्या कडक अटींचेही समर्थन केले. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी (इराणमध्ये युरेनियमचे कोणतेही संवर्धन न करणे आणि समृद्ध युरेनियम सामग्री देशाबाहेर हलवणे) या अटी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या चर्चेसंदर्भात समाधान व्यक्त करताना गिदोन साआर म्हणाले, "माझे मित्र एस. जयशंकर यांच्याशी नेहमीप्रमाणेच सकारात्मक चर्चा झाली. इराण 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मध्ये आर्थिक दहशतवादाच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेला आणि जहाजांच्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचवत आहे. अशा परिस्थितीत, भारत आणि खाडी क्षेत्रातील मित्र राष्ट्रांसह सर्व देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा, यासाठी इराणच्या या कृत्यांविरुद्ध ठोस कारवाई आवश्यक आहे."
'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा -अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादेत झालेली पहिल्या फेरीतील शांतता चर्चा निष्फळ ठरली. आता दुसऱ्या फेरीत काय होते? हे बघण्यासारखे असेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने करारासंदर्भात पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे. त्यांनी अमेरिकेला तसा संदेशही पाठवला आहे. तर, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही इस्लामाबाद चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे म्हटले आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अंतर्गत तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सीझफायरची मुदत संपण्यापूर्वी ही बैठक पार पडू शकते. यासाठी जिनेव्हा आणि इस्लामाबाद ही दोन ठिकाणे चर्चेत असून १६ एप्रिल ही संभाव्य तारीख असू शकते. या प्रक्रियेत तुर्की देखील दोन्ही देशांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, Jaishankar spoke with Israel's Foreign Minister Saar about the Hormuz Strait situation and Iran's nuclear ambitions. They stressed the need for action against Iranian economic terrorism and securing safe passage for ships.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के बीच, जयशंकर ने इज़राइल के विदेश मंत्री सार से होर्मुज जलडमरूमध्य की स्थिति और ईरान की परमाणु महत्वाकांक्षाओं पर बात की। उन्होंने ईरानी आर्थिक आतंकवाद के खिलाफ कार्रवाई और जहाजों के लिए सुरक्षित मार्ग सुनिश्चित करने की आवश्यकता पर बल दिया।