पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १२ हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस वेचं उद्घाटन केलं. सहा पदरी आणि २१३ किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ आता केवळ अडीच तासांवर येणार आहे. उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी डेहराडूनमध्ये भव्य रोड शो केला, ज्यामध्ये त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जनसागर लोटला होता.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या लोकांचीही मी क्षमा मागतो. मला येथे पोहोचायला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला आणि तुम्हाला बराच वेळ माझी वाट करावी लागली. मी वेळेवरच निघालो होतो, परंतु सुमारे १२ किलोमीटरच्या रोड शो दरम्यान लोकांमध्ये इतका उत्साह होता की गाडी वेगाने चालवणं कठीण झालं होतं. लोकांचे आशीर्वाद घेत हळूहळू पुढे सरकताना मला येथे पोहोचायला विलंब झाला."
"राज्याच्या प्रगतीला नवी गती"
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "उत्तराखंडने आपल्या स्थापनेची २५ वर्षे पूर्ण करून २६ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. आज दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनाने या प्रगतीत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. बाबा केदारनाथ यांच्या दर्शनानंतर माझ्या मुखातून सहज शब्द आले होते की, या शतकाचं तिसरं दशक हे उत्तराखंडचं दशक असेल. मला आनंद आहे की, डबल इंजिन सरकारची धोरणं आणि उत्तराखंडच्या जनतेचे कष्ट यामुळे हे युवा राज्य विकासाचे नवे आयाम प्रस्थापित करत आहे. हा प्रकल्प राज्याच्या प्रगतीला नवी गती देईल."
संपूर्ण क्षेत्राचा कायापालट होईल - मोदी
"हे इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रगतीची नवं दार आहे. यांच्याशी लोकांच्या आशा-आकांक्षा जोडलेल्या आहेत. हे कॉरिडॉर केवळ रस्ते नसून नवीन व्यापार आणि व्यवसायाचे मार्ग तयार करतात; गोदामे आणि कारखान्यांसाठी आधार निर्माण करतात. दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट होणार आहे" असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Web Summary : PM Modi inaugurated the Delhi-Dehradun Expressway, reducing travel time to 2.5 hours. He apologized for arriving late, citing enthusiastic crowds during the roadshow. Modi highlighted the project's role in boosting Uttarakhand's progress and economic development.
Web Summary : पीएम मोदी ने दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवे का उद्घाटन किया, जिससे यात्रा का समय 2.5 घंटे कम हो जाएगा। रोड शो के दौरान उत्साही भीड़ के कारण देरी से पहुंचने पर उन्होंने माफी मांगी। मोदी ने उत्तराखंड की प्रगति और आर्थिक विकास को बढ़ावा देने में परियोजना की भूमिका पर प्रकाश डाला।