शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:55 IST

छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यात वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर फुटून भीषण अपघात झाला आहे.

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. सिंघीतराई येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी भीषण स्फोट झाला. प्लांटमधील बॉयलर अचानक फुटल्याने झालेल्या या दुर्घटनेत ४० हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात ४ ते ५ मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र प्रशासनाने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

स्फोटाने परिसर हादरला, मजुरांची पळापळ

मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास जेव्हा प्लांटमध्ये काम सुरू होते, तेव्हा अचानक बॉयलरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर प्लांटमध्ये एकच खळबळ उडाली आणि मजुरांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धाव सुटली. घटनेच्या वेळी अनेक मजूर बॉयलरच्या परिसरात कर्तव्यावर होते, ज्यामुळे जखमींचा आकडा मोठा आहे.

मलब्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस ताफा घटनास्थळी रवाना झाला आहे. तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले असून रुग्णवाहिकांमार्फत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप काही मजूर ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता असल्याने बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहे.

सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह

हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या ही मोठी तांत्रिक चूक असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेमुळे प्लांटमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh Vedanta Plant Blast: Many Injured, Death Toll Feared

Web Summary : A major explosion at Vedanta power plant in Chhattisgarh injured over 40 workers. The boiler blast caused chaos and a potential loss of life. Rescue operations are underway, and safety concerns are being investigated.
टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडBlastस्फोट