शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:52 IST

Monalisa And Farman Khan : महाकुंभमुळे चर्चेत आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसलेच्या प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. फरमान खानसोबतच्या लग्नानंतर सुरू असलेल्या वादादरम्यान एका व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला आहे.

महाकुंभमुळे चर्चेत आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसलेच्या प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. फरमान खानसोबतच्या लग्नानंतर सुरू असलेल्या वादादरम्यान एका व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला होता की मोनालिसा पळून गेली आहे. फरमान असल्याचं सांगत एका व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र, नंतर त्याने कबूल केलं की, हा व्हिडीओ फेक असून केवळ मनोरंजनासाठी त्याने तो तयार केला होता.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःला फरमान खान म्हणवून घेत सांगतोय की, मोनालिसा पळून गेली असून तो तिचा शोध घेत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, "हॅलो फ्रेंड्स, मी अजमेर-पुष्करला आलो आहे, मोनालिसा पळून गेली आहे, तिला शोधण्यासाठी मी इथे आलो आहे." इंदूरच्या मोनालिसाशी केरळमध्ये लग्न करणाऱ्या फरमानसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला, पण नंतर तो खोटा असल्याचं सिद्ध झालं.

महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?

नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो बनवणाऱ्या व्यक्तीने स्पष्ट केलं की, त्याचं नाव अरविंद जोशी असून तो राजस्थानच्या बाडमेरचा रहिवासी आहे. त्याने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "मी हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवला होता. मी बाडमेर, राजस्थानचा आहे, मी फरमान नाही. काही लोक मला फरमान समजून कमेंट करत आहेत. मी फक्त कॉमेडी आणि मनोरंजनाच्या उद्देशाने हा व्हिडीओ बनवला होता. तो (फरमान) माझ्यासारखा दिसतो, म्हणून तुम्हाला तसं वाटलं असावं."

 "मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप

"फरमान परदेशात पळून जाऊ शकतो"

मोनालिसाला अभिनेत्रीची भूमिका देऊन चित्रपट बनवणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी फरमानचा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगत इशारा दिला की, याचा फायदा घेऊन खरा फरमान परदेशात पळून जाऊ शकतो. ते म्हणाले, "तो नेपाळमार्गे बांगलादेशला पळून जाऊ शकतो. जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जिहादी व्हायरल गर्लला अजमेरमध्ये शोधत आहे, तो फेक व्हिडीओ आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. लक्ष यावर देण्याची गरज आहे की, या गोंधळाचा फायदा घेऊन तो पळून जाण्याची शक्यता आहे."

"तो अभिनेता नाही..."; 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्या सनोज मिश्रांनी सांगितलं मोनालिसाच्या नवऱ्याचं सत्य

मोनालिसा अल्पवयीन असल्याचं सिद्ध

महाकुंभ दरम्यान माळा विकताना व्हायरल झालेली मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने मार्चमध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे फरमान खानशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. त्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबीयांनी या विवाहाला 'लव्ह जिहाद' असं नाव दिलं आणि ती अल्पवयीन असल्याचा दावा केला. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशीत महेश्वर सरकारी रुग्णालयातील नोंदीनुसार तिची जन्मतारीख ३० डिसेंबर २००९ असल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ लग्नाच्या वेळी तिचं वय १६ वर्षे २ महिने होतं. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ मार्च रोजी महेश्वर पोलीस ठाण्यात खानविरुद्ध अपहरण, पोक्सो (POCSO) कायदा आणि SC/ST कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Viral Girl Monalisa's Elopement Claim: Truth Behind the Video

Web Summary : Viral girl Monalisa's marriage to Farman Khan faces new twists. A video claiming she eloped was fake, created for entertainment. Director Sanoj Mishra fears the real Farman might exploit this to flee abroad. Monalisa's age is confirmed as minor.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ