शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:46 IST

Kharegaon Tollnaka Accident: खारेगाव टोलनाक्याजवळ अपघात; आयटी पार्कचे कर्मचारी घरी परतताना घडली घटना

जितेंद्र कालेकर

Thane Accident: वागळे इस्टेट येथील 'आशर आयटी पार्क'मध्ये काम संपवून डोंबिवलीकडे आपल्या घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खासगी मोटारकारला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने खारेगाव टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या मालवाहू ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कार चालक दीपक पटेकर (वय २६, रा. अंबिका नगर, ठाणे) याचा जागीच मृत्यू झाला असून सुजय पाटील (२०) याच्यासह चौघे सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींपैकी एका तरुणीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर उर्वरित तीन कर्मचाऱ्यांना ठाणे आणि नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्याजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी पहाटे ३.३० ते ३.५५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वागळे इस्टेट येथून ही कार डोंबिवलीच्या दिशेने जात होती. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या 'शिवशंकर ट्रान्सपोर्ट'च्या ट्रेलरला कारने पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये चालक दीपक आतमध्ये अडकला होता.

बचावकार्य आणि रुग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच कळवा पाेलिसांसह वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी क्रेन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.  कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागून गंभीर जखमी झालेल्या दीपकला मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी हे डोंबिवली पूर्व येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी सुजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला घणसोलीतील रुग्णालयात दाखल केले.

राज चिले (२१) आणि सुगम जयस्वाल (२४) या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्या स्नेहल भूसेकर (२३) या तरुणीवर कळवा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरू होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला. कळवा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : IT professionals' car accident: Driver dead, four seriously injured.

Web Summary : A car accident near Kharegaon toll plaza killed an IT professional and seriously injured four others returning home from work. The car crashed into a stationary trailer, resulting in severe damage and casualties. Injured individuals are receiving treatment in nearby hospitals.
टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे