शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
3
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
4
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
5
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
6
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
7
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
8
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
9
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
10
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
11
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
12
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
13
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
14
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
15
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
16
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
18
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
19
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
20
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:51 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

12 May, 26 11:54 AM

सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचा पाणीसाठा ३० ऑगस्टपर्यंत राखीव; ७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे. 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पाणीसाठा राखीव ठेवल्यानंतर शेतीच्या पाण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली. 

12 May, 26 11:51 AM

हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

हिमंता बिस्वा सरमा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

12 May, 26 11:30 AM

भाजीपाल्यांचे उत्पादन घटले, किंमती वाढल्या

वाढत्या उन्हाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरावर बसू लागला आहे. कडक तापमानामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत. फरसबीचे दर तर किरकोळ बाजारात २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

सविस्तर वाचा 

12 May, 26 11:26 AM

टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

टीसीएस कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या निदा खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान याच संदर्भातील अन्य गुन्ह्यात तिला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. निदाला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले. ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. धर्म परिवर्तनाच्या कटातही तिचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात मुंबई नाका पोलिसांनाही निदा खान हवी होती. त्यामुळे निदा खानला पुन्हा पोलीस कोठडीत जावे लागू शकते.  तिला पहिल्या गुन्ह्यात जामीन अर्ज दाखल करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचा सविस्तर 

12 May, 26 11:19 AM

पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी आणि..., -राज ठाकरेंचं आव्हान

तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं, असं आव्हानही राज ठाकरे यांनी या पत्रामधून दिलं.

12 May, 26 10:28 AM

आसाममध्ये पुन्हा 'हिमंता' सरकार, आज शपथविधी

आसाम:  हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

12 May, 26 10:23 AM

"ट्रेनला आग लागली, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. फरुखाबादच्या दिशेने जाणाऱ्या कासगंज एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, घाबरलेल्या प्रवाशांनी तातडीने 'चेन' खेचून ट्रेन थांबवली आणि वेग कमी होताच अनेकांनी खाली उड्या मारल्या. वाचा सविस्तर 

12 May, 26 10:23 AM

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार  पक्षामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र व्हायरल झालं असून, या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावंच नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण    आलं असतानाच पक्षाच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली असून, ती  लवकरच दुरुस्त केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा)

12 May, 26 10:20 AM

अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट

 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली असून, मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यावरून आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. (सविस्तर वाचा)

12 May, 26 10:19 AM

आसाममध्ये 'फिर एक बार, हिमंत सरकार'... आज शपथविधी

12 May, 26 10:18 AM

शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सार्वजनिक हिताचा विचार करून, त्यांनी राज्यातील ७१७ सरकारी मद्यविक्री केंद्रे येत्या दोन आठवड्यांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. (सविस्तर वाचा)