Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:17 IST

राकेशच्या लग्नाची ही बातमी वाचून..., अभिनेत्याच्या बहिणीने केला खुलासा

अभिनेता राकेश बापट 'तुम बिन' सिनेमामुळे हिंदीत सिनेसृष्टीत लोकप्रिय झाला होता. काही हिंदी सिनेमे केल्यानंतर मधल्या काळात तो थेट मराठी टेलिव्हिजनवर झळकला. 'नवरी मिळे हिटलरला' ही त्याची मालिका खूप गाजली. काही दिवसांपूर्वी तो 'बिग बॉस मराठी ६'चा सीझन संपवून बाहेर आला आहे. राकेश या सीझनचा रनर अप ठरला. दरम्यान तो बिग बॉसमध्ये असताना बाहेर त्याचं लग्न तेजश्री प्रधानसोबत ठरलं अशी अफवा पसरली होती. स्वत: राकेश आणि त्याच्या बहिणीनेच हा खुलासा केला.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापटची बहीण शीतल बापट म्हणाल्या, "राकेश बिग बॉसमध्ये असताना एक रील व्हायरल झालं होतं. राकेश आणि तेजश्री प्रधान मे मध्ये लग्न करणार आहेत असं आलं होतं.  माझ्या मैत्रिणी मला ते रील पाठवून म्हणतात,'अगं, आता ही कुठली सून?' काही संबंधच नव्हता. लोक अगदी तारखा वगैरे जाहीर करुन मोकळे झाले होते. माझ्या आईला नातेवाईक म्हणतात, 'ही बातमी खरी असेल तर आवडेलच आम्हाला'.

तर यावर राकेश म्हणाला, "मी बिग बॉसमध्ये असताना बाहेर इतकं काही घडलं मला माहितच नव्हतं." राकेश बापट सध्या मराठीतला हँडसम हंक म्हणून लोकप्रिय आहेच. त्याच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत. मात्र सध्या त्याचा लग्नाचा काहीही प्लॅन नाही असंही त्याने स्पष्ट केलं आहे.

राकेश बापटचं पहिलं लग्न २०११ साली अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत झालं होतं. एका मालिकेच्या सेटवर भेट होऊन ते प्रेमात पडले होते. मात्र काही कारणाने लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचा संसार मोडला. २०१९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. तेजश्री प्रधानचाही २०१५ साली घटस्फोट झाला आहे. तेजश्रीलाही अनेकदा दुसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तिने पुन्हा लग्न करावं अशी चाहत्यांचीही इच्छा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rakesh Bapat Denies Marriage Rumors with Tejashri Pradhan, Clarifies Plans

Web Summary : Rakesh Bapat refuted rumors of marrying Tejashri Pradhan, which surfaced during his Bigg Boss stint. His sister dismissed the claims, and Rakesh confirmed he is currently unmarried and has no immediate marriage plans following his divorce from Ridhi Dogra.
टॅग्स :राकेश बापटतेजश्री प्रधान मराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया