शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
5
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
6
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
7
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
8
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
9
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
10
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
11
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
12
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
13
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
14
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
15
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
16
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
17
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
18
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
19
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
20
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
Daily Top 2Weekly Top 5

हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:35 IST

Himanta Biswa Sarma's swearing-in ceremony: आसाममधील विधानसभा निवडणुकीत  भाजपाला दणदणीत  विजय मिळाल्यानंतर  हिमंता बिस्व सरमा हे  दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

गुवाहाटी - आसाममधील विधानसभा निवडणुकीत  भाजपाला दणदणीत  विजय मिळाल्यानंतर  हिमंता बिस्व सरमा हे  दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ  शिंदे  यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.  यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “आसामच्या जनतेने विकासावर विश्वास ठेवत भाजपला भरघोस समर्थन दिले. हिमंता बिस्व सरमा हे डायनामिक आणि व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या योजनांनी मोठे यश मिळवले.”

‘अरुणोदय’ आणि ‘लाडकी बहिणी’सारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. “हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे,” असेही ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून, देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “अमित शाह यांची चाणक्यनीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.” भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.”

महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवणही सांगितली. “चार वर्षांपूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळी आसाम सरकारने आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले,” असे शिंदे म्हणाले.“आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगाने होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde in Guwahati for Sarma's Oath, Praises His Leadership

Web Summary : Eknath Shinde attended Himanta Biswa Sarma's swearing-in, lauding Sarma's dynamic leadership and developmental initiatives in Assam. He credited Sarma's vision for the BJP's victory and highlighted the positive impact of schemes like 'Arunodoi' on citizens' lives. Shinde also praised PM Modi's vision and Amit Shah's strategy.
टॅग्स :AssamआसामBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना