Join us
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:23 IST

PM Modi Work From Home Appeal: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आणि 'रिमोट वर्किंग'ला (वर्क फ्रॉम होम) प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे.

PM Modi Work From Home Appeal: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आणि 'रिमोट वर्किंग'ला (वर्क फ्रॉम होम) प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाचा मोठा परिणाम कॉर्पोरेट क्षेत्रावर होताना दिसत असून, प्रसिद्ध टेक कंपनी 'झोहो'चे सीईओ श्रीधर वेंबू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे.

पंतप्रधान मोदींचं आवाहन काय होतं?

पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय संकटांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीबाबत सतर्क केलं होतं. त्यांनी नागरिक आणि कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचं आणि जिथे शक्य असेल तिथे 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडण्याचं सुचवलं आहे. तसंच खासगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचंही त्यांनी आवाहन केलंय.

पंतप्रधानांचं आवाहन आणि शुल्क वाढीच्या चर्चांनंतरही सोन्या-चांदीच्या किमतीचा भडका; काय आहेत नवे दर?

श्रीधर वेंबू यांची सोशल मीडिया पोस्ट

या आवाहनानंतर श्रीधर वेंबू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. "मला आशा आहे की आपण सर्वजण पंतप्रधानांच्या आवाहनाचं पालन करू. आमच्या कंपनीनं गेल्या काही महिन्यांत पूर्णपणे 'वर्क फ्रॉम ऑफिस' सुरू केलं होतं, परंतु आता आम्ही पुन्हा एकदा 'वर्क फ्रॉम होम' सुरू करण्याबाबत गांभीर्यानं विचार करत आहोत," असं ते म्हणाले. तसंच त्यांनी, शेतात ते नैसर्गिक शेतीचा अवलंब करत असून डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सक्रियपणे पर्याय शोधत आहेत, असंही नमूद केलं.

लहान विक्रेत्यांची काळजी कशी घेणार?

जेव्हा मोठी कार्यालये बंद होऊन कर्मचारी घरातून काम करू लागतात, तेव्हा कार्यालयाबाहेरील कॅन्टीन, चहाच्या टपऱ्या आणि इतर लहान विक्रेत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यावर स्पष्टीकरण देताना वेंबू यांनी सांगितलं की, 'झोहो' आपल्या कर्मचाऱ्यांची आणि ड्रायव्हर्सची साथ कधीही सोडत नाही. घरातून काम सुरू असतानाही कंपनी आपल्या कॅन्टीन स्टाफ आणि सपोर्ट टीमची पूर्ण काळजी घेते. यापूर्वीही कंपनीनं आपल्या स्वयंपाकघराचा वापर आजूबाजूच्या गरजू लोकांना मोफत अन्न देण्यासाठी केला होता आणि यावेळेसही त्याच मॉडेलचा अवलंब केला जाईल.

भविष्यातील वाटचाल

चेन्नई, तेनकाशी, नोएडा, बेंगळुरू आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये 'झोहो'ची मोठी कार्यालयं असून तिथे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. 'झोहो'सारख्या मोठ्या ब्रँडनं जर पुन्हा 'वर्क फ्रॉम होम'चा मार्ग स्वीकारला, तर इतर टेक कंपन्याही पंतप्रधानांच्या या आवाहनाचं पालन करून याच दिशेनं पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's Appeal: Tech Giant Zoho Considers Work From Home

Web Summary : Following PM Modi's appeal to reduce fuel consumption, Zoho CEO Sridhar Vembu is revisiting work from home. Zoho prioritizes employee well-being, ensuring support for staff and local vendors during remote work transitions, using existing resources to provide assistance.
टॅग्स :पंतप्रधाननरेंद्र मोदी