नाशिक - भोंदू अशोक खरात याचा ताबा आता अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) जाणार असून, त्या संदर्भातील ईडीचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. शिर्डीतील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीकडून त्याचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतला होता. दरम्यान, आर्थिक फसवणुकीप्रकरणी ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल केल्याने आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. मंगळवारी खरात याचा ताबा घेण्याची कारवाई ईडीकडून होऊ शकते. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समजते.
ईडीकडून खरातच्या बैंक खात्यांची, मालमत्तांची, आर्थिक देवाणघेवाणीची, तसेच विविध माध्यमांतून जमा झालेल्या पैशांच्या स्रोतांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. त्याने लोकांकडून घेतलेली रक्कम नेमकी कुठे गुंतवली, ती कोणाच्या खात्यात वळवली गेली का, तसेच व्यवहारांमध्ये इतर सहकाऱ्यांचा सहभाग होता का, याचाही तपास केला जाऊ शकतो. याशिवाय, मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत संशयित व्यवहारांचा मागोवा घेत ईडीकडून संबंधित कागदपत्रे, मालमत्ता आणि डिजिटल पुरावे तपासले जातील.
भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
"माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
चौकशीदरम्यान अनेक आर्थिक व्यवहार आणि नव्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. ईडीने खरातवर मोठ्या प्रमाणावर खंडणी रॅकेट चालवून 'बेनामी' बँक खात्यांच्या नेटवर्कमधून ७० कोटींपेक्षा अधिक रक्कम वळविल्याचा आरोप केला आहे.
आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं
रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची दोन दिवस अगोदरच एसआयटीने साडेपाच तास चौकशी केल्यानंतर आता ईडीकडूनही चाकणकर यांना चौकशीसाठीचे समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पदाचा दुरुपयोग करून खरातच्या मार्फत काही शिवनिका संस्थेतील सहभाग, तसेच आर्थिक व्यवहाराशी संबंध आदी बाबींची पडताळणी सीडीतर्फे चौकशीत केली जाऊ शकते. चाकणकर यांच्या चौकशीचा अहवाल एसआयटी येत्या तीन ते चार दिवसांत शासनाला देणार असल्याचे सांगण्यात येते.
Web Summary : ED will investigate Ashok Kharat's financial fraud, with his custody transferring from police. Rupali Chakankar faces increased scrutiny as ED summons her for questioning regarding financial dealings and alleged misuse of power related to Kharat.
Web Summary : ईडी अशोक खरात के वित्तीय धोखाधड़ी की जांच करेगी, हिरासत पुलिस से स्थानांतरित होगी। रूपाली चाकणकर की मुश्किलें बढ़ेंगी क्योंकि ईडी ने खरात से जुड़े वित्तीय सौदों और सत्ता के कथित दुरुपयोग के बारे में पूछताछ के लिए बुलाया है।