साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला बर्थडेच्या शुभेच्छा देणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. अभिनेत्री सीरत कपूर हिने अल्लू अर्जुनच्या बर्थडेला ८ एप्रिलला त्याच्यासोबतचे प्रायव्हेट जेटमधील फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. फोटोला तिने कॅप्शनही दिलं होतं. यानंतर अलिकडेच सीरत कपूरने तिचा एक हॉट फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोंवर एका युजरने केलेल्या घाणेरड्या कमेंटमुळे तिला संताप अनावर झाला. या ट्रोलरला सीरतने सडेतोड उत्तर देत चांगलंच सुनावलं आहे.
सीरतच्या फोटोवर एका युजरने "अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी" अशी कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले होते. या युजरला अभिनेत्रीने कमेंटमध्येच उत्तर दिलं आहे.
"कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकला म्हणून तुम्ही आदर दाखवताय असं होत नाही सर. एक महिला कधीच कोणाच्या मालकीची नसते. ती स्वत: एक व्यक्ती आहे. तिला स्वत:ची ओळख आहे. स्वत:चा आवाज आणि स्वप्न आहेत. कोणाचं कौतुक करायचं असेल तर आदराने करा. मालकी हक्क दाखवून नाही", असं म्हणत सीरतने युजरची बोलती बंद केली आहे.
सीरतने अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचे प्रायव्हेट जेटमधले फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या फोटोमधून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत, असं दिसत होतं. पण, त्या फोटोमुळे सीरतला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सीरतने काही वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Web Summary : Actress Seerat Kapoor gave a befitting reply to a user who made an inappropriate comment linking her to Allu Arjun after she posted birthday wishes. She asserted that women are not property and deserve respect.
Web Summary : अभिनेत्री सीरत कपूर ने अल्लू अर्जुन से जोड़ने वाली अनुचित टिप्पणी करने वाले यूजर को करारा जवाब दिया। उसने कहा कि महिलाएं संपत्ति नहीं हैं और सम्मान की पात्र हैं।