शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:35 IST

कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत ले-आऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही.  महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

पुणे : राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करून निवासी क्षेत्रात ऑक्टोबर २०२४ पूर्वी झालेल्या जमिनीच्या तुकड्यांना मान्यता दिली आहे. मात्र, त्यानंतर कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत ले-आऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही.  महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. त्यानंतरही असे तुकडे झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.  

बावनकुळे म्हणाले, ‘पीएमआरडीए, एमएमआरडीए, पुणे महापालिका तसेच ज्याठिकाणी प्रादेशिक आराखडा मंजूर झाला आहे, अशा गावांपासून २०० मीटरपर्यंत असलेले तुकडे आता नियमित केले आहेत. मात्र, शेतीचे तुकडे करता येणार नाहीत. शेतीचे तुकडे मान्य केल्यास अनेक ठिकाणी अनियंत्रित विकास होईल. मात्र, आता १५ ऑक्टोबर २०२४ नंतर ले-आऊट मंजूर करूनच विकावे लागणार आहे. तरीही असे झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत.’ 

भूसंपादनाची माहिती अगोदरच मिळवून काही व्यापारी आणि संबंधितांनी जमिनींची खरेदी-विक्री केल्याचे प्रकार सरकारच्या निदर्शनास आले आहे.

‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लवकरच होणार लागू 

राज्यात जुलैपासून ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्याचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड अंतिम मालकी दर्शवत नाही. तो केवळ नोंदणीचा पुरावा आहे.

नवीन कायद्यामुळे नागरिकांना निश्चित मालकी हक्क मिळेल. ऑनलाइन व्यवहार, बोजा नोंदणी आणि थेट व्यवहारामुळे मध्यस्थांची गरज उरणार नाही. महाराष्ट्र हे देशातील पहिले ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लागू करणारे राज्य ठरेल, असा दावा त्यांनी केला.   

गैरव्यवहार करणाऱ्यांना भरपाई मिळणार नाही

गुगल मॅप, वर्षभरातील नोंदणी व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. असे गैरव्यवहार करणाऱ्यांना एक रुपयाही भरपाई मिळू दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Land Deal Layout Approval Mandatory; Crime Will Be Registered: Minister

Web Summary : Land transactions require layout approval post-October 2024, warned Minister Bawnakule. Violators face criminal charges. Government to implement 'Land Titling Act' soon, ensuring definitive property ownership and preventing fraudulent compensation claims. This act will bring transparency and reduce the role of intermediaries.
टॅग्स :Land Buyingजमीन खरेदीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे