Abbott India Stock Price: फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'एबॉट इंडिया' सध्या गुंतवणूकदारांमध्ये चर्चेत आहे. कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी झालेल्या बोर्ड बैठकीत कंपनीनं प्रति शेअर ६५६ रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये ५२५ रुपये अंतिम लाभांश आणि १३१ रुपये विशेष लाभांश यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कंपनीनं प्रति शेअर ४७५ रुपये लाभांश दिला होता, ज्याच्या तुलनेत यंदाची रक्कम मोठी आहे.
डिविडेंडसाठी 'रेकॉर्ड डेट' काय?
या लाभांशाचा लाभ मिळवण्यासाठी कंपनीनं २४ जुलै २०२६ ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की, या लाभांशासाठी पात्र ठरण्याकरिता गुंतवणूकदारांनी या तारखेच्या किमान एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स खात्यात असणं आवश्यक आहे, जेणेकरून रेकॉर्ड डेटपर्यंत ते शेअर्स डिमॅट खात्यात जमा होतील.
पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
तिमाही निकालात नफ्यात वाढ
मार्च २०२६ ला संपलेल्या तिमाहीत एबॉट इंडियाच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा दिसून आली आहे. कंपनीचा नफा ७.६० टक्क्यांनी वाढून ३९४.९३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा नफा ३६७.०४ कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीत कंपनीचा ऑपेरेटिंग रेवेन्यू १,७०९.५१ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ६.५४ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत महसूलात ०.८४ टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. कंपनीचं एकूण उत्पन्न १,७८५.१० कोटी रुपये झालं आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत ६.२२ टक्क्यांनी जास्त आहे.
ऑपरेटिंग कामगिरी (EBITDA)
कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात (EBITDA) वार्षिक आधारावर १२.२ टक्क्यांची वाढ झाली असून तो ४८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा ४२८.५४ कोटी रुपये होता. विशेष म्हणजे, कंपनीच्या 'EBITDA मार्जिन'मध्येही १४० बेसिस पॉईंट्सची सुधारणा झाली आहे. थोडक्यात, कंपनीचं वाढलेलं उत्पन्न, नफा आणि ऐतिहासिक लाभांशाची घोषणा यामुळे एबॉट इंडियाच्या स्टॉककडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Abbott India declared a ₹656 dividend per share, including a special dividend. Record date is July 24, 2026. The company's Q4 profit rose 7.6% to ₹394.93 crore, driven by strong operating performance.
Web Summary : एबॉट इंडिया ने ₹656 प्रति शेयर का डिविडेंड घोषित किया, जिसमें एक विशेष डिविडेंड भी शामिल है। रिकॉर्ड तिथि 24 जुलाई, 2026 है। कंपनी का Q4 मुनाफा 7.6% बढ़कर ₹394.93 करोड़ हो गया।