शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:29 IST

Google Translateला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात 'I Love You' ला मागे टाकत 'हा' शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे.

टेक्नोलॉजीच्या जगात गेल्या दोन दशकांपासून भाषिक अडथळे दूर करणाऱ्या 'Google Translate'ला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने एक अतिशय रंजक माहिती शेअर केली आहे. जगभरातील युजर्सनी गुगल ट्रान्सलेटवर सर्वाधिक वेळा कोणता शब्द सर्च केला असेल, असा प्रश्न विचारला तर अनेकांना वाटेल की तो 'I Love You' असेल. मात्र, गुगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाच्या या शब्दाला मागे टाकत एका दुसऱ्याच शब्दाने बाजी मारली आहे.

कृतज्ञतेचा शब्द ठरला नंबर वन!

गुगल इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, गेल्या २० वर्षांत जगभरात सर्वाधिक ट्रान्सलेट झालेला शब्द 'Thank You' अर्थात 'धन्यवाद' हा आहे. दुसऱ्या क्रमांकावर 'I Love You' हा शब्द आहे. इंटरनेटच्या या जगात आजही लोक एकमेकांचे आभार मानण्याला सर्वाधिक पसंती देतात, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गुगलने हा आनंद साजरा करण्यासाठी 'Thank You' हा शब्द विविध भाषांमध्ये लिहून एक खास व्हिज्युअलही शेअर केले आहे.

२००६ पासून सुरू झाला प्रवास

गुगल ट्रान्सलेटची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. सुरुवातीला हे टूल अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे होते, जिथे फक्त शब्दांचे अर्थ मिळत असत. मात्र, आता हे प्लॅटफॉर्म एआयमुळे  इतके प्रगत झाले आहे की, ते केवळ शब्दांचा अर्थच नाही, तर वाक्यांची रचना, संदर्भ आणि बोलण्याचा लहेजा देखील अचूकपणे समजून घेते. आज गुगल ट्रान्सलेट शेकडो भाषांना सपोर्ट करते.

आता उच्चारही सुधारणार!

आपल्या २० व्या वाढदिवसानिमित्त गुगलने ट्रान्सलेटमध्ये एक नवीन धमाकेदार फीचर आणले आहे. ते म्हणजे 'एआय-पावर्ड प्रोनन्सिएशन प्रॅक्टिस'. आता तुम्ही केवळ शब्दांचे भाषांतरच पाहू शकणार नाही, तर ते बोलायचे कसे, याचा सरावही करू शकाल. यासाठी गुगलने 'Pronounce' बटन दिले आहे. जेव्हा तुम्ही एखादा शब्द बोलता, तेव्हा हे अ‍ॅप तुमचे विश्लेषण करून सांगेल की तुमचे उच्चार किती अचूक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Google Translate: 'Thank You' Outranks 'I Love You' in 20 Years!

Web Summary : Google Translate celebrates 20 years, revealing 'Thank You' as the most translated phrase, surpassing 'I Love You'. Launched in 2006, the platform now uses AI for accurate translations and context. A new 'Pronounce' feature helps users improve pronunciation.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल