शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:22 IST

Nashik TCS Case Nida Khan : नाशिकच्या 'टीसीएस'मधील लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रकाराचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सोपविला आहे.

नाशिकच्या 'टीसीएस'मधील लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रकाराचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सोपविला आहे. या प्रकरणात 'लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचे' (पॉश) कसे उल्लंघन झाले आणि त्यामुळे महिलांना काम करणे किती असह्य झाले होते, याचा सविस्तर खुलासा ५० पानांच्या या अहवालात करण्यात आला आहे.

अनेक महिलांना याबाबत तक्रार करायची होती, पण सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि सुरक्षित तक्रार यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी तक्रार केली नाही, असेही अहवालात नमूद आहे. कंपनीत पॉश कायद्याचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी 'पॉश'च्या एकाही सदस्याने कंपनीला भेट दिली नाही किंवा खात्री करून घेतली नाही. कामकाजाचे ठिकाण महिलांसाठी असुरक्षित आणि हानिकारक आढळून आले असल्याचे आयोगाने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निर्देशानुसार एक तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली. न्यायमूर्ती साधना जाधव (निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने काम केले. समितीने शिफारशींसह हा ५० पानांचा अहवाल सादर केला.

 ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य

समितीच्या शिफारशी

'पॉश' कायद्याच्या तरतुदींचं कठोर पालन व्हावं, प्रत्येक कार्यालयात सक्रिय अंतर्गत समिती व तक्रार निवारण यंत्रणा असावी, तक्रारदार महिलांच्या नोकरीवर परिणाम होऊ नये याची हमी असावी, सीसीटीव्ही आणि सुरक्षा यंत्रणा नियमित तपासणीखाली ठेवली जावी, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.

अहवाल काय सांगतो?

आरोपी डॅनिश, तौसिफ व रजा मेमन यांनी कार्यालयावर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. टीसीएसच्या अश्विनी चेनानी यांच्या मौनामुळे आरोपींना संरक्षण मिळाले. सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते, पण ते कार्यरत नव्हते. तसेच या प्रकरणी पॉश कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे समितीला दिसून आले आहे. कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना पॉश नियमांविषयी माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड, पोस्टर्स किंवा सूचना, आयसी सदस्यांविषयी माहिती किंवा कलम-१९ अंतर्गत नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या दंडांविषयी माहितीचे फलक लावणे आवश्यक होते.

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Case: Fear of Shame, Pressure; Shocking Revelations in Report

Web Summary : TCS Nashik's sexual harassment case reveals POSH violations. Women feared reporting due to social pressure and lack of safe mechanisms. CCTV cameras were inactive, and accused had control. The committee recommends strict POSH compliance and active grievance redressal.
टॅग्स :TCS Nashik CaseTCS नाशिक केसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिकCourtन्यायालयWomenमहिला