अधिक मास(Adhik Maas 2026) ज्याला आपण 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखतो, हा काळ अध्यात्म आणि आत्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या काळात केलेली उपासना इतर वेळेपेक्षा कैक पटीने अधिक पुण्य देऊन जाते. जर तुम्हाला या महिन्यात आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची असेल, तर भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेला भगवद्गीतेतील १५ वा अध्याय आणि पुढे दिलेल्या विष्णु मंत्राचा जप हा सर्वोत्तम मार्ग आहे.
हे ही वाचा : शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
हिंदू धर्मात अधिक मासाला 'मलमास' तसेच 'पुरुषोत्तम मास' म्हटले जाते, कारण या महिन्याचा अधिपती स्वतः भगवान विष्णू (पुरुषोत्तम) आहेत. या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते. यासाठी व्रत स्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर करावी असे शास्त्र सांगते. त्यातही उत्तम फलदायी उपासना पुढीलप्रमाणे आहे :
१. भगवद्गीतेचा १५ वा अध्याय: 'पुरुषोत्तम योग'
भगवद्गीतेतील १५ व्या अध्यायाला 'पुरुषोत्तम योग' असे नाव आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अध्यायाचे सार: या अध्यायात संसाररूपी वृक्षाचे (अश्वत्थ वृक्ष) वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आवश्यक आहे.
का वाचावा?: हा अध्याय गीतेचा 'अर्क' मानला जातो. याचे नित्य पठण केल्याने, त्याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते.
फळ: अधिक मासात रोज १५ व्या अध्यायाचे वाचन केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते.
हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
२. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचे सामर्थ्य
हा १२ अक्षरी मंत्र (द्वादशाक्षरी मंत्र) अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक मासात तुळशीच्या माळेवर रोज १०८ वेळा या मंत्राचा जप करावा.
अर्थ: "मी त्या भगवानाला (वासुदेवाला) नमस्कार करतो जो सर्वांच्या हृदयात वास करतो."
सामर्थ्य: हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती.
या उपासनेचे फायदे:
मानसिक शांती: या मंत्राच्या उच्चारणाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एकाग्रता वाढते.
संरक्षण: हा मंत्र एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो, ज्यामुळे घरातील कलह आणि बाहेरील बाधा दूर होतात.
मोक्ष प्राप्ती: निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यास समर्थ आहे.
हे ही वाचा : Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
३. उपासनेची योग्य पद्धत
>>सकाळी लवकर उठून स्नान करावे.
>>देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावे.
>>प्रथम १५ व्या अध्यायाचे मनोभावे वाचन करावे.
>>त्यानंतर माळेवर 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा किमान एक माळ (१०८ वेळा) जप करावा.
Web Summary : Adhik Maas, dedicated to Lord Vishnu, is ideal for spiritual growth. Recite Bhagavad Gita's 15th chapter and the 'Om Namo Bhagavate Vasudevaya' mantra for blessings, peace, and prosperity throughout the month.
Web Summary : भगवान विष्णु को समर्पित अधिक मास आध्यात्मिक विकास के लिए उत्तम है। भगवद्गीता के 15वें अध्याय और 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्र का जाप करके पूरे महीने आशीर्वाद, शांति और समृद्धि पाएँ।