1 / 7प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 2 / 7प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असते. 3 / 7प्राजक्ताने नुकतंच तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. 4 / 7फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या कुटुंबात कोण कोण आहे, याची ओळख चाहत्यांना करून दिली आहे. 5 / 7या फोटोमध्ये प्राजक्ताच्या कुटुंबातील ४ जनरेशन एकत्र दिसत आहेत. एका कार्यक्रमातील हा फोटो आहे. 6 / 7'आजी-आजोबा, त्यांच्या दोन मुली+ मुलींचे नवरे. मोठ्या मुलीची दोन पोरं. (म्हणजे आई-आम्ही दोघे) पोराची बायको आणि त्याच्या पोरी', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. 7 / 7प्राजक्ताने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.