'धुरंधर' आणि 'धुरंधर २'च्या अभूतपूर्व यशानंतरdसुपरहिट अभिनेता रणवीर सिंह आता नव्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' या पुस्तकावर आधारित चित्रपटाचे हक्क रणवीरने विकत घेतले असून, तो स्वतः या चित्रपटात महादेवाची भूमिका साकारणार आहे. या प्रोजेक्टसाठी त्याने बिर्ला स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे.
पिंकव्हिला रिपोर्टनुसार, रणवीर सिंह आपल्या 'माँ कसम फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करणार आहे. हा चित्रपट सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून मेकर्स याचा एक भव्य सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याच्या विचारात आहे. या पुस्तकाची कथा तीन भागांमध्ये पडद्यावर मांडली जाणार असून सध्या त्याच्या स्क्रीनप्लेवर काम सुरू आहे.
रणवीर सिंह गेल्या काही काळापासून 'मेलुहा'ची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी उत्सुक होता. या पौराणिक पुस्तकाचे विश्व उभे करण्यासाठी टीम जोरदार तयारी करत आहे. या ट्रिलॉजीमधील पहिल्या भागाचे चित्रीकरण २०२८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये रणवीर भगवान शिवाच्या मुख्य भूमिकेत असेल, तर इतर कलाकारांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे.
या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. स्क्रीनप्लेचे काम एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतरच दिग्दर्शकाची अधिकृत निवड केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा'चे राइट्स मिळवण्यासाठी रणवीरने मोठी रक्कम मोजली आहे, मात्र ही रक्कम सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
या प्रोजेक्टपूर्वी रणवीर सिंह आदित्य धरच्या आगामी चित्रपटाचे काम पूर्ण करणार आहे, ज्याचे शूटिंग २०२७ मध्ये सुरू होईल. याव्यतिरिक्त जय मेहता दिग्दर्शित 'प्रलय' या चित्रपटातही रणवीर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'प्रलय'चे चित्रीकरण ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन वर्ष रणवीर इतर दोन सिनेमात व्यग्र असणार आहे.
'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' ही अमिश त्रिपाठी यांच्या शिव ट्रिलॉजीमधील पहिली कादंबरी आहे. ही १९०० इसवी सन पूर्व सिंधू संस्कृतीवर आधारित एक काल्पनिक कथा आहे. आहे. यामध्ये शिवाला एका सामान्य व्यक्तीच्या रुपात दाखवण्यात आले आहे. त्याचे कर्म त्याला महादेव बनवते असा हा प्रवास आहे. आता रणवीर सिंग या पौराणिक पात्राला पडद्यावर कसे जिवंत करतो याकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Ranveer Singh acquired rights to Amish Tripathi's 'The Immortals of Meluha'. He will portray Lord Shiva, producing under his banner. The film, planned as a trilogy, is in early development, with filming expected to start in 2028 after other projects.
Web Summary : रणवीर सिंह ने अमीश त्रिपाठी की 'द इम्मोर्टल्स ऑफ मेलुहा' के अधिकार खरीदे। वह भगवान शिव की भूमिका निभाएंगे, जिसका निर्माण उनके बैनर तले होगा। फिल्म, जिसे त्रयी के रूप में योजना बनाई गई है, प्रारंभिक विकास में है, और अन्य परियोजनाओं के बाद 2028 में फिल्मांकन शुरू होने की उम्मीद है।