शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:54 IST

1 / 7
Post Office Schemes: केंद्र सरकार देशातील नागरिक आणि विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना सरकारी बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही चालवल्या जातात.
2 / 7
यामध्ये मंथली इनकम स्कीम (MIS) ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षित सरकारी बचत योजना आहे जी पोस्ट ऑफिसमार्फत राबवली जाते. या योजनेचा मुख्य फायदा असा आहे की एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा ठराविक उत्पन्नाची हमी मिळते.
3 / 7
सध्या पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम स्कीमवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच एकरकमी गुंतवणूक करावी लागते. खाते उघडल्यानंतर पुढील ५ वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा व्याजाच्या स्वरूपात फिक्स उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते आणि हा व्याजाचा पैसा दरमहा तुमच्या बचत खात्यात जमा केला जातो.
4 / 7
या सरकारी योजनेत तुम्ही किमान १,००० रुपयांपासून खाते सुरू करू शकता. मात्र जर तुम्हाला मोठी कमाई करायची असेल, तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल. वैयक्तिक खात्यांतर्गत तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता, तर जॉइंट खात्यांतर्गत जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
5 / 7
जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून या योजनेत १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला दरमहा ८,६३३ रुपयांचे फिक्स व्याज मिळतं. पोस्ट ऑफिसची ही एमआयएस योजना ५ वर्षांनंतर मॅच्युअर होते आणि त्यानंतर तुमची गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात परत केली जाते.
6 / 7
या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातच ट्रान्सफर केलं जातं. याचा अर्थ असा की या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.
7 / 7
जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचं बचत खातं नसेल, तर आधी तुम्हाला ते खातं उघडावं लागेल, त्यानंतरच तुम्ही एमआयएस खातं उघडून दरमहा हक्काची कमाई सुरू करू शकता.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा