28 Jan, 26 08:24 PM
अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले
अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार
28 Jan, 26 07:41 PM
सुप्रिया सुळे यांचं कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन
28 Jan, 26 07:32 PM
अजित पवार अमर रहे, कार्यकर्त्यांच्या घोषणा
28 Jan, 26 07:26 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सकाळी बारामतीमध्ये येणार
28 Jan, 26 07:23 PM
अजित पवारांचं पार्थिव रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे रवाना
28 Jan, 26 07:18 PM
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्समुळे तपासाला मदत होणार आहे.
28 Jan, 26 07:08 PM
शरद पवारांची प्रतिक्रिया
28 Jan, 26 07:01 PM
हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा
28 Jan, 26 06:47 PM
हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही. राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणारं नाही - शरद पवार
28 Jan, 26 06:46 PM
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असून लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
28 Jan, 26 06:42 PM
28 Jan, 26 06:37 PM
काळाने पोरकं केलं - रुपाली चाकणकर
28 Jan, 26 06:33 PM
अजित पवारांच्या अपघाताचं कारण काय? विमान वाहतूक मंत्री काय म्हणाले?
28 Jan, 26 06:32 PM
आधारस्तंभ हरपला; दादांचं निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी - प्रफुल पटेल
28 Jan, 26 06:13 PM
अजित पवारांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवणार
अजित पवार यांचं पार्थिव थोड्याच वेळात बारामती रुग्णालयातून रवाना होणार असून जवळच असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहेत
28 Jan, 26 06:01 PM
नवाब मलिक आणि झिशान सिद्धिकी बारामतीत पोहोचले
28 Jan, 26 05:53 PM
अमित ठाकरे यांची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. प्रशासनावरील पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख सर्वांनाच माहित आहे, पण त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कोरोनाच्या कठीण काळात, जेव्हा मी आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा प्रश्न घेऊन त्यांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी कोणताही राजकीय भेद न ठेवता आमचा विषय अत्यंत संयमाने ऐकून घेतला होता. केवळ ऐकूनच घेतले नाही, तर ‘दोन दिवसांत कॅबिनेटमध्ये निर्णय होईल’ हा दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि हजारो आरोग्य दूतांना न्याय मिळवून दिला. लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची ती धडाडी आणि कामाचा वेग मला जवळून अनुभवता आला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्व हरवले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
- अमित ठाकरे, मनसे नेते
28 Jan, 26 05:50 PM
अजित दादांचा मृतदेह जिनं सर्वात पहिला ओळखला ती काय म्हणाली?
28 Jan, 26 05:45 PM
अजित पवारांचे मामेभाऊ चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर...
28 Jan, 26 05:23 PM
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन घेतले नमुने...
28 Jan, 26 04:54 PM
राज्यपालांसह मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
28 Jan, 26 04:48 PM
मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर...
28 Jan, 26 04:20 PM
विमानात कोणताही बिघाड नव्हता, विमान मालकाची प्रतिक्रिया
28 Jan, 26 04:13 PM
प्रफुल्ल पटेल बारामतीत पोहोचले...
28 Jan, 26 04:04 PM
VSR विमान कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयात अपघाताची चौकशी करणारे अधिकारी
अजित पवार ज्या कंपनीच्या प्रायव्हेट विमानातून प्रवास करत होते त्या VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दिल्ल्तील कार्यालयात 'एएआयबी'ची टीम चौकशीसाठी पोहोचली
28 Jan, 26 04:01 PM
अजित पवारांचे जाणे धक्कादायक; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
28 Jan, 26 03:58 PM
राज ठाकरे बारामतीसाठी मुंबईतून रवाना
28 Jan, 26 03:56 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आचार्य देवव्रत बारामती रुग्णालयात पोहोचले
28 Jan, 26 03:32 PM
फडणवीस, शिंदे बारामतीला पोहोचले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामती विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे आणि इतर नेतेही उपस्थित आहेत. पवार कुटुंबीयांची घेणार भेट
28 Jan, 26 02:52 PM
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
बारामतीमध्ये पवार कुटुंबातील सदस्यांना भेटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले.
28 Jan, 26 02:28 PM
शरद पवार बारामतीच्या रुग्णालयात पोहोचले
28 Jan, 26 02:19 PM
बारामती विमानतळावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार पोहोचले
बारामती विमानतळावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे पोहोचले; विमानतळावर उतरताच पवार कुटुंबाला अश्रू अनावर
28 Jan, 26 02:13 PM
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत होणार अंत्यसंस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार
28 Jan, 26 01:56 PM
बारामती विमानतळावर पोहोचताच शरद पवारांनी घेतली अपघाताची माहिती
28 Jan, 26 01:48 PM
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला- उद्धव ठाकरे
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
- उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख
28 Jan, 26 12:50 PM
महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे
28 Jan, 26 12:48 PM
अजित पवार हे स्पष्टवक्ता आणि दिलेला शब्द पाळणारे होते- जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
मी शून्य झालो आहे. सकाळी उठल्यावर ही वाईट बातमी कळली. अजित पवार हे स्पष्टवक्ता आणि दिलेला शब्द पाळणारे होते. महाराष्ट्रात संस्था बरोबर काम.करताना अजित पवार सोबत जवळीक वाढली ती कायम टिकली.अभ्यासपूर्ण वाचन करून उत्तर देणारे दादा होते. पवार कुटुंबीयांसोबत तीन पिढ्यांचे सबंध आहेत. ते आजही टिकून आहेत. दादा यांनी मार्केटिंग फेडरेशन, बँक मध्ये निर्णय प्रक्रियेत दरवेळी मला सामावून घेतले जात होते. महाराष्ट्राला गरज असताना आणि पवाराशी जवळीक झाली होती. काही दिवसापूर्वी शरद पवार, अजित पवार आणि मी असे तिघेजण तीन तास गप्पागोष्टी करीत होतो. ती आठवण सतावत आहे. दादाचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही. शेकाप पक्ष आणि पाटील कुटुंबियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे.
- जयंत पाटील, सरचिटणीस शेकाप
28 Jan, 26 12:46 PM
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत- आदित्य ठाकरे
28 Jan, 26 12:35 PM
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा शोकसंदेश
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीए कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, राज्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित असलेले अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात अकाली निधन झाल्याचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले आहे. या कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. मी देवाकडे त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.
- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री
28 Jan, 26 12:34 PM
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचा शेवट! - अमित साटम
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचा शेवट! आज बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे निधन झाले, ही बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. प्रशासनावर असलेली जबरदस्त पकड, पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची शिस्त आणि 'दिलेला शब्द पाळणारा नेता' अशी त्यांची ओळख महाराष्ट्राच्या जनमानसात कायम राहील. सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे, सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणारे दादा आज आपल्याला सोडून गेले. अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि या कठीण प्रसंगी आम्ही पवार कुटुंबाच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!
- अमित साटम, भाजपा मुंबई अध्यक्ष
28 Jan, 26 12:31 PM
महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी- अनिल परब
विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. कणखर नेतृत्व, स्पष्ट निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
- अनिल परब, नेते, उद्धवसेना
28 Jan, 26 12:28 PM
महाराष्ट्रासाठी काम करणारा चांगला नेता गमावला- सचिन तेंडुलकर
28 Jan, 26 12:23 PM
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE
28 Jan, 26 12:08 PM
अजित पवारांच्या विमान अपघाताचा नेमका घटनाक्रम...
28 Jan, 26 12:04 PM
अजित पवारांचं विमान कोसळलं तेव्हा नेमकं काय झालं? प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
28 Jan, 26 11:58 AM
एक दिलदार आणि दमदार मित्र गमावला- देवेंद्र फडणवीस
अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याची वार्ता सगळ्यांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्रातले लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, राज्याच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा हे अतिशय संघर्षशील असं नेतृत्त्व होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशाप्रकारचं नेतृत्त्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते अशावेळी त्यांचं जाणं हे मनाला चटका लावणारं आहे. माझ्यासाठी तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेल्याची भावना आहे. त्यांच्या कुटुंबासाठी देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. सकाळपासूनच मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्या कुटुंबाशी चर्चा करुन ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया ताईंशी आणि पार्थ पवारांशी बोलणं झालं. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर पुढचे सगळे निर्णय त्यांच्या समंतीने घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबतच तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. जे घडलंय त्यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाहीय.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
28 Jan, 26 11:50 AM
रोहित पवारांना अश्रू अनावर, बारामतीच्या रुग्णालयात पोहोचले
28 Jan, 26 11:21 AM
Ajit Pawar Death: मी पवार कुटुंबीयांसोबत ताकदीने उभा- राहुल गांधी
28 Jan, 26 11:34 AM
Ajit Pawar Death: धनंजय मुंडेंना अश्रू अनावर, तातडीने बारामतीकडे रवाना
28 Jan, 26 11:47 AM
बारामतीत रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फोडला टाहो...
28 Jan, 26 11:21 AM
अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE
28 Jan, 26 11:18 AM
४० वर्षांची अतूट मैत्री असलेला नेता गमावला- नितीन गडकरी
28 Jan, 26 11:14 AM
बारामतीत रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी
28 Jan, 26 11:12 AM
जनतेशी घट्ट नातं नसलेला नेता हरपला- पंतप्रधान मोदी
28 Jan, 26 10:57 AM
मोठा भाऊ हरपल्याची मनात भावना- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. अजित दादांनी सकाळी ६ वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे"
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
28 Jan, 26 11:09 AM
विमान गोल फिरून आले अन् कोसळले... प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात कसा झाला
28 Jan, 26 10:57 AM
CLICK HERE: महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार कसे बनले 'दादा'; शरद पवारांकडून घेतलेत राजकारणाचे धडे
28 Jan, 26 10:53 AM
हसन मुश्रीफांना अश्रू अनावर...
28 Jan, 26 10:42 AM
पंतप्रधान मोदींनी घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून बारामती येथील विमान अपघाताबाबत माहिती घेतली: महाराष्ट्र सरकार
28 Jan, 26 10:33 AM
विमान अपघाताच्या ठिकाणची ताजी दृश्य...
अजित पवार यांच्या विमानाचा जिथं अपघात झाला त्याठिकाणची ताजी दृश्य समोर आली आहेत...
28 Jan, 26 10:32 AM
महाराष्ट्राची मोठी हानी- खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
28 Jan, 26 10:27 AM
शरद पवार दिल्लीहून रवाना
अजित पवार यांच्या निधनाची माहिती पवार कुटुंबीयांना देण्यात आली. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून रवाना
28 Jan, 26 10:24 AM
अजित पवार यांचं निधन
28 Jan, 26 10:23 AM
बारामतीत घटला विमान अपघात
बारामतीच्या विमानतळा जवळच अजित पवार यांच्या खासगी विमानाचा सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.