शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:17 IST

US-Iran War Update: अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील बंदरावर भीषण हल्ला केला आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये बंदराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे.

इराण ज्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर आपला हक्क सांगत जहाजांकडून लाखो डॉलर्सचा टोल वसूल करत होता, आता तिथेच युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणचे 'प्राईड' मानल्या जाणाऱ्या केशम बेटावर भीषण हल्ला केला असून, तेथील बंदर आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. 'कोपरनिकस सेंटिनल-२' या सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या फोटोंमध्ये केशम बंदरातून धुराचे लोट निघताना स्पष्ट दिसत आहेत.

लर्क आणि केशम बेटांच्या मधून जाणाऱ्या जहाजांकडून इराणने जबरदस्तीने टोल वसूल करण्यास सुरुवात केली होती. काही तेलवाहू जहाजांना तर २० लाख डॉलर्स (सुमारे १६ कोटी रुपये) मोजावे लागत होते. अमेरिकेने नेमका याच बहमन व्यापारी बंदरावर आणि मासेमारी घाटावर हल्ला करून इराणची आर्थिक नाडी आवळली आहे. १ एप्रिल ते २ एप्रिल दरम्यान झालेल्या या हल्ल्यात बंदराचा किनारा पूर्णपणे तुटल्याचे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत आहे.

विमानावरून दोन्ही देशांचे दावे-प्रतिदावे
इराणचा दावा: इराणच्या IRGC ने असा दावा केला आहे की, त्यांनी केशम बेटाच्या वर एका शत्रूच्या (अमेरिकन) फायटर जेटला पाडले आहे. याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमेरिकेचे उत्तर: अमेरिकेने इराणचा दावा फेटाळून लावला आहे. "आमचे कोणतेही विमान पडलेले नाही, इराणने गेल्या काही दिवसात ६ वेळा खोटे बोलले आहे," अशी टीका अमेरिकन संरक्षण विभागाने केली आहे.

केशम आयलंड: पर्यटनाचे केंद्र की मिसाईल शहर?
५५८ चौरस मैलावर पसरलेले केशम बेट शांतता काळात एक पर्यटन स्थळ आहे. मात्र, इराणने या बेटाच्या खाली एक 'मिसाईल शहर' वसवले आहे. येथूनच जहाजांवर हल्ले केले जातात. विशेष म्हणजे, १८६३ पर्यंत 'रॉयल इंडियन नेव्ही' या बेटावरून आपले कामकाज पाहत होती.

ट्रम्प यांचा अंतिम इशारा
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत इराणला इशारा दिला आहे. "इराणचा सर्वात मोठा पूल आता इतिहास जमा झाला असून तो कधीही बांधला जाणार नाही. अजून बरेच काही होणे बाकी आहे. खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करारासाठी पुढे यावे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US 'Surgical Strike' on Hormuz; Iran's Qeshm Island Bombed!

Web Summary : US forces reportedly struck Iran's Qeshm Island, targeting its port and infrastructure after Iran allegedly extorted ships in the Strait of Hormuz. Satellite images show significant damage. Iran claims to have downed a US jet, which the US denies. Trump issued a warning to Iran.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIranइराणLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई