मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण सातत्याने गुंतागुंतीचं होत चाललं आहे. याच दरम्यान या प्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजने तपासाला एक नवी दिशा दिली असून अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. फुटेजमध्ये ट्विशा शर्मा इमारतीच्या पायऱ्यांवरून गच्चीवर जाताना दिसत आहे. यानंतर साधारण एका तासाने तिचा पती समर्थ आणि इतर तीन लोक तिला खाली घेऊन येताना दिसत आहेत.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा घटनाक्रम आता तपास यंत्रणांसाठी एक महत्त्वाचा पुरावा बनला आहे. त्या एका तासादरम्यान गच्चीवर नक्की काय घडलं, हे समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विशा शेवटची हेडफोन घेऊ पायऱ्या चढताना दिसली होती, ती नॉर्मल होती. परंतु एका तासानंतर तिची प्रकृती अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आली. याच कारणामुळे नातेवाईक या मृत्यूला संशयास्पद म्हणत निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत.
ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
फोन कट होण्यापूर्वी आईने ऐकला एक आवाज
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अखेर त्या एका तासात असं नेमकं काय घडलं ज्याने एका सुशिक्षित तरुणीचा जीव घेतला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, गच्चीवर जाताना ट्विशा सामान्य दिसत होती आणि तिच्या हातात हेडफोनही होता. गच्चीवर पोहोचल्यानंतर तिने आपल्या आईला फोन केला. आईने दिलेल्या माहितीनुसार, संभाषणादरम्यान ट्विशाने सासरच्या छळाबद्दल सांगितलं. याच दरम्यान आईला फोनवर पाठीमागून एका व्यक्तीचा आवाज ऐकू आला आणि अचानक कॉल कट झाला. तो आवाज बहुधा समर्थचा असू शकतो, असा आईचा दावा आहे.
MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
पायऱ्यांवर दिला सीपीआर
काही वेळानंतर ट्विशाच्या आईने तिची सासू गिरिबाला यांना फोन करून सांगितलं की, ट्विशा फोन उचलत नाहीय. यानंतर गिरिबाला आणि समर्थ वर पोहोचले, जिथे ट्विशा जिमनास्टिक इलास्टिक बेल्टच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळली. यानंतरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पती समर्थ, एक नातेवाईक आणि एक नोकर ट्विशाला पायऱ्यांवरून खाली आणताना दिसत आहेत. याच दरम्यान ते पायऱ्यांवरच तिला सीपीआर (CPR) देण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात, परंतु हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. नंतर तिला खाली आणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
एका तासात काय झालं?
फुटेजमध्ये सासू गिरिबाला सिंह एका खोलीत जाताना आणि काही सेकंदांनंतर बाहेर पडून खाली जाताना दिसत आहेत. आता तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की, गच्चीवर घालवलेल्या त्या एका तासात ट्विशाने केवळ आई आणि भावाशीच संवाद साधला होता की आणखी कोणाशी संपर्क केला होता? तसेच कॉल कट होण्यापूर्वी आईने फोनवर नक्की कोणाचा आवाज ऐकला होता? सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
Web Summary : Twisha Sharma's death in Bhopal is under investigation. CCTV footage shows her going to the terrace, followed by her husband and others bringing her down an hour later. Her mother alleges harassment and heard a man's voice before the call cut. Police are investigating the events of that hour.
Web Summary : भोपाल में ट्विशा शर्मा की मौत की जांच जारी है। सीसीटीवी फुटेज में वह छत पर जाती दिख रही है, जिसके बाद उसका पति और अन्य लोग उसे एक घंटे बाद नीचे लाते हैं। उसकी मां ने उत्पीड़न का आरोप लगाया और कॉल कटने से पहले एक आदमी की आवाज सुनी। पुलिस उस घंटे की घटनाओं की जांच कर रही है।