शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:24 IST

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही सरकारविरोधात नाही. जर सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करणार असेल, तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही.

जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चर्चेची संधी दिली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी "सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू," असे विधान केले होते. या विधानाचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना अंतरवाली सराटी येथे चर्चेसाठी येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.

Top Marathi News LIVE Updates: इंधन दरवाढीच्या चटक्यांसोबत इंधन टंचाईच्या झळा, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलसाठी रांगा

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही सरकारविरोधात नाही. जर सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करणार असेल, तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. प्रसाद लाड यांनी २३ तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना मंजुरी मिळवून द्यावी आणि मंजुरीचे पत्र घेऊन थेट अंतरवाली सराटी येथे यावे.

प्रसाद लाड यांच्या सकारात्मक विधानानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजातर्फे मऊ भूमिका घेतली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी गावागावांत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या बैठका त्यांनी २३ तारखेपर्यंत स्थगित केल्या आहेत. मात्र, ३० मे रोजी सुरू होणाऱ्या त्यांच्या 'आमरण उपोषणाची' घोषणा अद्याप कायम आहे. सरकार २३ तारखेपर्यंत काय निर्णय घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

जरांगे यांनी इशाराही दिला

चर्चेचे निमंत्रण देतानाच मनोज जरांगे यांनी सरकारला कडक शब्दांत इशाराही दिला आहे. "आम्ही सहसा स्वतःहून कुणालाही चर्चेसाठी बोलावत नाही. तुम्हाला आम्ही सन्मानाने निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे आता आमच्याशी कोणताही दगाफटका करू नका," असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange invites Prasad Lad for talks, warns government.

Web Summary : Manoj Jarange Patil offered talks to the government regarding Maratha reservation after Prasad Lad's positive statement. Village meetings are postponed until 23rd. Jarange warns the government against deceit, keeping his hunger strike plan intact.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा