गुरनूर ब्रार (कसोटी आणि वनडे संघ: गुरनूर ब्रारने डिसेंबर २०२२ मध्ये गोव्याविरुद्ध लिस्ट-ए क्रिकेटमध्ये आणि त्याच महिन्यात रेल्वेविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्सने राज बावाच्या जागी २० लाख रुपयांमध्ये त्यांना संघात घेतले होते, जिथे त्यांनी २८ एप्रिल २०२३ रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पदार्पण केले. यानंतर आयपीएल २०२५ च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्यांच्यावर १.३० कोटी रुपयांची मोठी बोली लावत संघात समाविष्ट केले.
हर्ष दुबे (कसोटी आणि वनडे संघ: महाराष्ट्राच्या मातीतून आलेले फिरकीपटू हर्ष दुबे यालाही अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांत स्थान मिळाले. हर्ष यांनी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळताना छाप पाडली. २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफी हंगामात हर्षने ६९ विकेट्स घेतले. आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्यांना ३० लाख रुपयांमध्ये रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात घेतले. आयपीएल २०२६ च्या हंगामात हैदराबादकडून त्याने ८ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या.
मानव सुथार (कसोटी संघ): राजस्थानमधून आलेले डाव्या हाताचे फिरकीपटू आणि खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाज मानव सुथारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी संघात संधी देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते राजस्थानकडून तर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानसाठी खेळताना मानव यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक मॅच-विनिंग कामगिरी केली आहे आणि फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही.
प्रिन्स यादव (वनडे संघ): २४ वर्षीय उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या केवळ एकदिवसीय संघात जागा मिळवली. २०१४ मध्ये त्यांनी 'पुरानी दिल्ली ६' संघाकडून खेळताना सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत प्रिन्सने १० सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी दिल्लीच्या व्हाईट-बॉल संघात स्थान मिळवले. यापूर्वी त्यांनी दिल्लीसाठी दोन रणजी सामने खेळले आहेत. तर, २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांनी आपला पहिला टी२० सामना खेळला.