सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. रोज पोहे, उपमा, पराठे, ओट्स खाऊन कंटाळा येतो. अशावेळी इडली आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कडक उन्हाळ्यात अनेकदा जड आणि तेलकट अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. यामुळे एक वेगळा आणि हेल्दी पर्याय तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता तो म्हणजे बीटची इडली. बीटची इडली ही पोटासाठी अत्यंत हलकी, पचनास सोपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टीक असते.
बीटमध्ये पाणी आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतं. याशिवाय बीटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न उन्हाळ्यातील सुस्ती आणि थकवा दूर करून शरीराला झटपट ऊर्जा देतात. म्हणूनच या उन्हाळ्यात तुमच्या नाश्त्याला एक हेल्दी आणि कलरफुल ट्विस्ट द्या, जो मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल.
बीटच्या इडलीसाठी लागणारं साहित्य
रवा - १.५ कप
दही - १ कप
बीट प्युरी - १/२ कप (उकडलेल्या बीटची पेस्ट)
पाणी - आवश्यकतेनुसार
ईनो (Eno) किंवा बेकिंग सोडा - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - इडली पात्राला लावण्यासाठी
बीटच्या इडली बनावण्याची पद्धत
- एका मोठ्या भांड्यात रवा, दही, बीटची प्युरी आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं एकत्र करून घ्या.
- आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून इडलीसारखं घट्ट पीठ (बॅटर) तयार करा. हे पीठ १५-२० मिनिटांसाठी झाकून ठेवा, जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल.
- इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा आणि इडली पात्राला थोडं तेल लावून घ्या.
- इडली पात्रात पीठ टाकण्याच्या अगदी आधी पिठामध्ये ईनो किंवा बेकिंग सोडा घाला आणि त्यावर एक चमचा पाणी टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
- आता हे पीठ लगेच इडलीच्या पात्रामध्ये ओता आणि मध्यम ते तीव्र आचेवर १०-१२ मिनिटं वाफवून घ्या.
- गॅस बंद करा आणि इडल्या थोड्या थंड झाल्यावर साच्यातून बाहेर काढा. तुमची गरमागरम, मऊ आणि जाळीदार 'बीटची इडली' तयार आहे. ही इडली खोबऱ्याची चटणी किंवा सांबार याच्यासोबत खाऊ शकता.
Web Summary : Tired of the same breakfast? Try Beetroot Idli! It's light, nutritious, and easy to digest, perfect for summer. This colorful twist is packed with fiber, antioxidants, and iron, keeping you hydrated and energized. A simple recipe everyone will love.
Web Summary : रोज के नाश्ते से ऊब गए हैं? चुकंदर इडली आजमाएं! यह हल्का, पौष्टिक और पचाने में आसान है, गर्मी के लिए बिल्कुल सही। फाइबर, एंटीऑक्सिडेंट और आयरन से भरपूर, यह आपको हाइड्रेटेड और ऊर्जावान रखता है। एक सरल रेसिपी जो सभी को पसंद आएगी।