फक्त ५० मीटरच्या अंतराने अजित पवार आयुष्य हरले, विमान रनवेपासून एवढ्या कमी अंतरावर उतरले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:26 IST2026-01-28T16:25:43+5:302026-01-28T16:26:50+5:30
jit Pawar plane crash 50 meters distance:

फक्त ५० मीटरच्या अंतराने अजित पवार आयुष्य हरले, विमान रनवेपासून एवढ्या कमी अंतरावर उतरले...
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता अत्यंत हृदयद्रावक माहिती समोर येत आहे. ज्या धावपट्टीवर विमान सुरक्षितपणे उतरणार होते, त्या धावपट्टीपासून अवघ्या ५० मीटर बाजुलाच विमानाचा भीषण अपघात झाला.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
हवाई उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैमानिकाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला होता. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. मात्र, जमिनीपासून अवघ्या १०० फूट उंचीवर असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारील कच्च्या जमिनीवर आदळले.
प्रत्यक्षदर्शी आणि एटीसी (ATC) कडील माहितीनुसार, विमान धावपट्टीच्या सुरुवातीच्या टोकापासून केवळ ५० मीटर अंतरावर कोसळले. आदळताच विमानाचे इंधन टाकी फुटली आणि ४ ते ५ मोठे स्फोट झाले. विमानाचे अवशेष इतक्या वेगाने उडाले की ते जवळच्या घरांपर्यंत पोहोचले.
सुरक्षिततेचा अभाव नडला?
बारामती विमानतळावर 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम' (ILS) नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून लँडिंग करावे लागते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना हा ५० मीटरचा अंदाज चुकला आणि महाराष्ट्राने एक कणखर नेता गमावला.