Ajit Pawar Last Rites: अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:48 IST2026-01-28T19:46:49+5:302026-01-28T19:48:47+5:30

Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बारामतीत अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार.

Ajit Pawar Baramati Airport plane crash update: Ajit Pawar's mortal remains will be taken to Vidya Pratishthan Complex, where they will be kept for the last rites. | Ajit Pawar Last Rites: अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार

Ajit Pawar Last Rites: अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार

बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज रात्री १० वाजेपर्यंत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आपल्या लाडक्या 'दादां'ना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले असून, तिथे केवळ 'दादा... दादा...' असा टाहो ऐकायला मिळत आहे. उद्या, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता याच मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अजित पवारांचे निधन ही देशासाठी मोठी हानी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या सकाळी बारामतीत दाखल होणार आहेत. ते पार्थिवाचे दर्शन घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन करतील. या पार्श्वभूमीवर, भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाची सूत्रे हातात घेतली असून तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आज रात्री १० पर्यंत: विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे अंतिम दर्शन. कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहून वेळ वाढू शकते.

उद्या पहाटे ६ ते ९: पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथील निवासस्थानी नेले जाईल.

उद्या सकाळी ९ ते ११: पुन्हा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंतिम दर्शनासाठी पार्थिव आणले जाईल.

सकाळी ११ वाजता: पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.

Web Title : अंतिम दर्शन के लिए अजित पवार का पार्थिव विद्या प्रतिष्ठान भेजा गया

Web Summary : अजित पवार का पार्थिव अंतिम दर्शन के लिए बारामती के विद्या प्रतिष्ठान में है। कल सुबह 11 बजे राजकीय सम्मान के साथ अंतिम संस्कार होगा। प्रधानमंत्री मोदी और गृह मंत्री शाह शामिल होंगे। बारामती हवाई अड्डे पर सुरक्षा बढ़ाई गई। पार्थिव शरीर को उनके मूल गांव काटेवाड़ी भी ले जाया जाएगा।

Web Title : Ajit Pawar's Body to Vidya Pratishthan for Final Viewing

Web Summary : Ajit Pawar's body is at Vidya Pratishthan, Baramati, for final viewing. The funeral will be held with state honors tomorrow at 11 AM. PM Modi and Home Minister Shah will attend. Security is heightened at Baramati airport. The body will also be taken to his native village, Katewadi.