अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:23 IST2026-01-28T17:22:12+5:302026-01-28T17:23:23+5:30

Ajit Pawar Plane Crash Reasons: अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर आली आहेत. विमानाचा वेग १८३ नॉट्स इतका जास्त का होता? 'टेबलटॉप रनवे' नडला का? वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण.

Ajit Pawar Plane Crash Reasons: Ajit Pawar's plane was overspeeding, the pilot...; Senior pilot with experience of Baramati's Dandaga said what went wrong... | अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...  

अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला असतानाच, आता या भीषण दुर्घटनेमागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर येत आहेत. बारामतीमधील 'टेबलटॉप रनवे' आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा 'असामान्य वेग' यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज बारामतीच्या विमानतळाचा दांडगा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने वर्तवला आहे.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, अजित पवारांचे विमान धावपट्टीकडे येत असताना ते 'अनस्टेबल' होते. जमिनीपासून ५०० फूट उंचीवर असताना विमानाचा वेग १८३ नॉट्स होता, जो वास्तविक १०६ ते १३५ नॉट्स दरम्यान असायला हवा होता. मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्याने विमानाचे लँडिंग सुरक्षित करणे कठीण झाले, असे मत या वैमानिकाने मांडले. 

तसेच बारामती विमानतळाचा रनवे हा 'टेबलटॉप' स्वरूपाचा आहे. अशा रनवेच्या दोन्ही टोकांना किंवा एका बाजुला खोल दरी किंवा उतार असतो, ज्यामुळे लँडिंगसाठी अत्यंत अचूकतेची गरज असते. बारामतीमध्ये ILS नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून विमान उतरावे लागते. या स्थितीत थोडा जरी अंदाज चुकला, तरी विमान धावपट्टीवरून घसरण्याचा धोका असतो.

'गो-अराउंड' न करण्याचा निर्णय
विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग रद्द करून 'गो-अराउंड' केले होते. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वेग जास्त होता, तेव्हा पुन्हा 'गो-अराउंड' करणे आवश्यक होते. पण वैमानिकांनी लँडिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, जो जीवघेणा ठरला, असे मत या वैमानिकाने मांडले. 

शेवटच्या मिनिटाचा गूढ संवाद
नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सकाळी ८:४३ वाजता एटीसीने (ATC) धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याची परवानगी दिली होती. मात्र, वैमानिकांनी या परवानगीचा 'रीडबॅक' (प्रतिसाद) दिला नाही. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात विमानात आग लागल्याचे दिसून आले. आजतकने याबाबतचे वृतत् दिले आहे. 

Web Title : अजित पवार के विमान हादसा: गति, रनवे, पायलट का निर्णय जांच के दायरे में।

Web Summary : अजित पवार का विमान दुर्घटना अत्यधिक गति और बारामती के चुनौतीपूर्ण 'टेबलटॉप' रनवे के कारण होने की संभावना है। एक वरिष्ठ पायलट का सुझाव है कि दूसरी लैंडिंग के दौरान 'गो-अराउंड' का प्रयास किया जाना चाहिए था। एटीसी के साथ संचार विफलता भी चिंता पैदा करती है।

Web Title : Ajit Pawar's plane mishap: Speed, runway, pilot's decision under scrutiny.

Web Summary : Ajit Pawar's plane crash likely due to excessive speed and Baramati's challenging 'tabletop' runway. A senior pilot suggests a 'go-around' should have been attempted during the second landing. Communication failure with ATC also raises concerns.