शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:52 IST

US-Iran War Update: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ३ बड्या जनरलना पदावरून हटवले आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक वाढली असून ट्रम्प यांनी जेडी वेन्स यांची फिरकी घेतली.

इराणसोबतच्यायुद्धाच्या रणधुमाळीत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन लष्करी नेतृत्वात मोठी 'सर्जिकल स्ट्राईक' केली आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ जनरल रँडी जॉर्ज यांच्यानंतर आता आणखी दोन वरिष्ठ जनरलना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, इराणसोबतच्या करारावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांची फिरकी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रँडी जॉर्ज यांच्यासोबतच खालील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. चीफ ऑफ आर्मी ट्रान्सफॉर्मेशन अँड ट्रेनिंग कमांड जनरल डेव्हिड होडने, चीफ ऑफ आर्मी चॅप्लिन कॉर्प्स जनरल विल्यम ग्रीन ज्युनियर यांनाही सक्तीने निवृत्त करण्यात आले आहे. लष्कराच्या पुनर्रचनेसाठी आणि ट्रम्प यांच्या धोरणांशी सुसंगत नेतृत्व आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ट्रम्प यांची 'ईस्टर लंच'वर फटकेबाजी
व्हाईट हाऊसमध्ये आयोजित ईस्टर लंच दरम्यान ट्रम्प यांनी इराण डीलबद्दल मिश्किल भाष्य केले. ते म्हणाले, "जर इराणसोबतची डील यशस्वी झाली, तर त्याचे पूर्ण श्रेय मी घेईन. पण जर ही डील फिसकटली, तर मी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांना दोषी धरीन!" त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वर्दळ वाढली
'विंडवार्ड' या समुद्री गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा हळूहळू वाढत आहे. बुधवारी या मार्गावरून १६ जहाजे सुखरूप बाहेर पडली. विशेष म्हणजे, फिलीपिन्सला इराणकडून सुरक्षित प्रवासाची अधिकृत परवानगी मिळाली आहे. युद्धापूर्वी या मार्गावरून दररोज १३० जहाजे जात असत, त्या तुलनेत हा आकडा अजूनही कमी असला तरी ही सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.

इराणचा UN ला इशारा
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत होणाऱ्या मतदानापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कडक इशारा दिला आहे. "कोणतीही प्रक्षोभक कारवाई, मग ती UN मध्ये का असेना, परिस्थिती अधिक गंभीर करेल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump jokes Iran deal success his, failure Vance's; stirs controversy.

Web Summary : Trump quipped Iran deal success is his, failure Vice President Vance's, sparking laughter and controversy. Military leadership changes continue. Hormuz Strait sees increased ship traffic. Iran warns UN against provocative actions ahead of a vote.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध