शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 20:27 IST

संबंधित सूत्रांनी याला 'महत्त्वपूर्ण युद्ध-सक्षम फौज' असे नाव दिले आहे. सौदी अरेबियावर मोठा हल्ला झाल्यास लष्कराला मजबूत पाठबळ देणे, हा या तैनातीचा उद्देश आहे....


अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतच प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने परस्पर संरक्षण करारांतर्गत सौदी अरबमध्ये तब्बल ८००० सैनिक, एक संपूर्ण लढाऊ विमान स्क्वॉड्रन आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात केली आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, तीन सुरक्षा अधिकारी आणि दोन सरकारी सूत्रांनीही याची पुष्टी केली आहे. 

संबंधित सूत्रांनी याला 'महत्त्वपूर्ण युद्ध-सक्षम फौज' असे नाव दिले आहे. सौदी अरेबियावर मोठा हल्ला झाल्यास लष्कराला मजबूत पाठबळ देणे, हा या तैनातीचा उद्देश आहे. मात्र, पाकिस्तानचे लष्कर, परराष्ट्र मंत्रालय अथवा सौदी अरेबियाच्या सरकारी मीडिया कार्यालयाकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

लढाऊ विमानं अन् हवाई संरक्षण यंत्रणा तैनात -
माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जवळपास १६ विमानांचे संपूर्ण स्क्वॉड्रन सौदीमध्ये तैनात केले आहे. यात प्रामुख्याने चीनच्या सहकार्याने विकसित केलेली 'JF-17 थंडर' लढाऊ विमाने, जी एप्रिलच्या सुरुवातीलाच तेथे पोहोचली आहेत. दोन ड्रोन स्क्वॉड्रन, चिनी बनावटीची 'HQ-9' हवाई संरक्षण यंत्रणेचाही समावेश आहे. याचे संचालन पाकिस्तानी कर्मचारी करत आहेत तर खर्च सौदी अरेबिया कर आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणशी संबंधित संभाव्य संघर्षाच्या स्थितीत, या पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची मुख्य भूमिका सल्लागार आणि प्रशिक्षकाची असेल. या नवीन तुकडीमुळे सौदीतील पाकिस्तानी सैनिकांची संख्या आणखी वाढली आहे. एका गोपनीय करारानुसार, सौदी अरबमध्ये ८०००० पर्यंत पाकिस्तानी सैनिक आणि युद्धनौकांच्या तैनातीचाही उल्लेख आहे, मात्र युद्धनौका पोहोचली आहेत की नाही, अद्याप स्पष्ट नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Deploys Troops, Aircraft to Saudi Amid Middle East Tensions

Web Summary : Amidst heightened US-Israel-Iran tensions, Pakistan deployed 8000 troops, fighter jets, and air defense systems to Saudi Arabia under a mutual defense agreement. The deployment aims to bolster Saudi defenses against potential attacks, with Pakistani personnel acting as advisors and trainers.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणWarयुद्ध