शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:50 IST

1 / 15
Vande Bharat Sleeper Train Ticket Rate: भारतीय रेल्वेसाठी मैलाचा दगड ठरलेल्या वंदे भारत ट्रेनने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. आताच्या घडीला संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेन सर्वाधिक लोकप्रिय आहे. केवळ भारतात नव्हे, तर सगळ्या जगात वंदे भारत ट्रेन औत्सुक्याचा विषय ठरत आहे. देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळ आहे.
2 / 15
Sleeper Vande Bharat Train Ticket Rate: स्लीपर वंदे भारत ट्रेन तिकीट दरांच्या बाबतीत जगातील सर्व हायस्पीड ट्रेनच्या तुलनेत सर्वांत स्वस्त, किफायतशीर असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. हावडा ते कामाख्या या मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर आता मुंबई ते बंगळुरू मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
3 / 15
Vande Bharat Sleeper Train Ticket Rate Comparison: वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेची एक प्रिमियम ट्रेन असून, लोकप्रियतेच्या शिखरावर ही ट्रेन आहे. प्रवाशांना आणखी चांगली सेवा मिळावी तसेच अधिकाधिक तिकिटे उपलब्ध असावीत, यासाठी भारतीय रेल्वे २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.
4 / 15
भारतीय रेल्वे २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची योजना आखत आहे. तसेच पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.
5 / 15
भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे. आधुनिक सुविधा आणि उच्च गतीने सुसज्ज असलेली ही ट्रेन झपाट्याने भारताची नवी ओळख बनत आहे. जर 'वंदे भारत स्लीपर'सारखी ट्रेन परदेशात धावली असती, तर तिचे भाडे किती असते? अलीकडील एका तुलनेतून भारत, जपान, चीन, युरोप आणि अमेरिकेतील हायस्पीड रेल्वेच्या तिकीट दरांमधील एक फरक समोर आला आहे.
6 / 15
चीनमध्ये हायस्पीड ट्रेनचे तिकीट दर प्रति किलोमीटर सुमारे ७ ते १२ रुपये असल्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ चीनमधील हायस्पीड ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर दर १ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अंदाजे ₹७ हजार ते ₹१२ हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.
7 / 15
अमेरिकेत हायस्पीड ट्रेनच्या तिकिटांचे दर हे सुमारे १५ ते ३० रुपये असल्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ चीनमधील हायस्पीड ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर दर १ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अंदाजे ₹१५ हजार ते ₹३० हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.
8 / 15
युरोपमध्ये हायस्पीड ट्रेनचा खर्च प्रति किलोमीटर १० ते १८ रुपयांपर्यंत असू शकतो. १ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अंदाजे ₹१० हजार ते ₹१८ हजारांचा खर्च येऊ शकतो.
9 / 15
जपान येथील हायस्पीड ट्रेनचा तिकीट दर प्रति किलोमीटर १२ ते २० रुपयांपर्यंत असू शकतो. यामुळे एखाद्या प्रवाशाला १ हजार किलोमीटर प्रवास करायचा असेल तर त्याला अंदाजे ₹१२ हजार ते ₹२० हजारांचा खर्च येऊ शकतो, असे सांगितले जाते.
10 / 15
भारतातील वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर प्रति किलोमीटर सुमारे ₹२.४० ते ₹३.८० आहे. याचा अर्थ असा की, १ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अंदाजे ₹२,४०० ते ₹३,८०० खर्च येऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की, भारतातील आधुनिक रेल्वे प्रवास इतर देशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या स्वस्त आहे. यामुळेच भारताला जगातील सर्वांत किफायतशीर रेल्वे जाळ्यांपैकी एक मानले जाते.
11 / 15
वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी आणि वेगवान व्हावा, या पद्धतीने करण्यात आलेली आहे. यामध्ये आधुनिक स्लीपर कोच, सुधारित सुरक्षा प्रणाली, आरामदायी आसने आणि प्रगत प्रवासी सुविधा असण्याची अपेक्षा आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे.
12 / 15
देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्राइव्हेट कपल कूपची सुविधा देण्यात आली आहे. तसेच फर्स्ट एसी कोचमध्ये शॉवर सुविधाही देण्यात आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली, सुधारित सस्पेंशन, एनर्जी एफिशिएंट आणि अधिक एरोडायनामिक डिझाइन आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली, बायो-वॅक्यूम टॉयलेट्स, नाईट-लायटिंग, सीसीटीव्ही, ऑटो-डोअर्स सुविधा ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत.
13 / 15
एखाद्या विमानासारख्या सेवा या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष टॉयलेट, बेबी केअर एरिया, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रत्येक कोचमध्ये रिडींग लाइट्स, चार्जिंग पॉइंट्स, फोल्डेबल स्नॅक टेबल्स, जीएपआरपी इंटिरिअर पॅनल्स बसवले आहेत.
14 / 15
वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत.
15 / 15
वंदे भारत स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. युरोपीय मानकांनुसार ही ट्रेन बनवण्यात आली आहे. १६ कोचच्या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण ८२३ बर्थ आहेत. मुंबई ते बंगळुरू मार्गावर आता दुसरी वंदे भारत ट्रेन कधी सुरू होते, त्याचे तिकीट किती असेल, याबाबत प्रवाशांच्या मनात उत्सुकता आहे.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेticketतिकिटchinaचीनAmericaअमेरिकाJapanजपानrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलIndiaभारतIndiaभारत