वाशिंग्टन: अमेरिकेतील इडाहो येथील 'माउंटेन होम एअरफोर्स बेस' वर आयोजित एअर शो दरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. चित्तथरारक कसरती करत असताना अमेरिकेचे दोन अत्यंत आधुनिक EA-18G ग्राउलर फायटर जेट्स हवेतच एकमेकांना धडकले. या भीषण टक्करनंतर एअरबेसवर तात्काळ लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, या अत्यंत भयानक अपघातातून चारही क्रू मेंबर्स (पायलट) चमत्कारीकरित्या बचावले आहेत.
स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १२:३० वाजता हा अपघात झाला. 'गनफाइटर स्कीज एअर शो' दरम्यान हे दोन्ही लढाऊ विमान हवेत कसरती दाखवत होते, त्याच वेळी त्यांची एकमेकांशी जोरदार टक्कर झाली. टक्कर इतकी भीषण होती की विमानांचे हवेतच तुकडे झाले आणि घटनास्थळावरून काळ्या धुण्याचा प्रचंड गुबार उठताना दिसला. दोन्ही विमानांचे अवशेष एअरबेसपासून सुमारे दोन मैल अंतरावर जाऊन पडले.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती!
सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. विमानांची टक्कर झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच आसमानमध्ये चार पॅराशूट उघडताना दिसले. दोन्ही विमानांमधील चारही पायलटांनी वेळेत 'इजेक्ट' केले. शोच्या उद्घोषकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही क्रू मेंबर्स सुखरूप असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
८ वर्षांनंतरचा शो आणि आठवणी ताज्या
माउंटेन होम एअरफोर्स बेसवर तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा एअर शो आयोजित करण्यात आला होता आणि आयोजक गेल्या दोन वर्षांपासून याची तयारी करत होते. या अपघातानंतर रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या क्रॅशमुळे एअरबेसवर यापूर्वी झालेल्या अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत:
२०१८: रनवेवर एका हँग ग्लायडर पायलटचा क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता.
२००३: एक थंडरबर्ड जेट क्रॅश झाले होते, ज्यामध्ये पायलट वेळेत इजेक्ट झाला होता.
Web Summary : Two US Navy fighter jets collided at the Mountain Home Air Force Base air show in Idaho. All four crew members ejected safely. The air show was immediately put on lockdown. Sunday's events have been canceled.
Web Summary : इडाहो में माउंटेन होम एयर फोर्स बेस पर एयर शो के दौरान दो अमेरिकी नौसेना के लड़ाकू विमान टकरा गए। सभी चार क्रू सदस्य सुरक्षित रूप से बाहर निकल गए। एयर शो को तुरंत लॉकडाउन कर दिया गया। रविवार के कार्यक्रम रद्द कर दिए गए हैं।