Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी IPL चा नवा सिक्सर किंग; अभिषेक शर्माचा विक्रम मोडला

IPL मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो टॉपला

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 21:11 IST

Open in App

IPL 2026 DC vs RR Vaibhav Suryavanshi Set New Record Of Most Sixes In IPL : आधुनिक क्रिकेट जगतातील 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी याने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नवा इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा मोठा विक्रम आपल्या नावे केला. अभिषेक शर्माला मागे टाकत १५ वर्षीय बॅटर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील भारताचा नवा सिक्सर किंग ठरला आहे. कमालीची गोष्ट म्हणजे आयपीएल करिअरमधील आपल्या दुसऱ्याच हंगामात त्याने हा महारेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१२ सामन्यात ४३ षटकार

IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम याआधी अभिषेक शर्माच्या नावे होता. २०२४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक सलामीवीराने ४२ षटकार मारले होते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर तिसरा षटकार मारत वैभव सूर्वंशीनं अभिषेकला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या हंगामात १२ सामन्यात ४३ षटकारांसह तो IPL चा नवा सिक्सर किंग बनला आहे.

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

IPL मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय

  • वैभव सूर्यवंशी - ४३* (२०२६)
  • अभिषेक शर्मा - ४२ (२०२४)
  • श्रेयस अय्यर - ३९ (२०२५)
  • विराट कोहली - ३८ (२०१६ आणि २०२४)

वैभव सूर्यवंशीला खुणावतोय ख्रिस गेलचा रेकॉर्ड
 
IPL इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. २०१२ च्या हंगामात कॅरेबियन फलंदाजाने १५ सामन्यात ५९ षटकार मारले होते. जर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहचला तर निश्चितच हा रेकॉर्ड मोडण्याचीही संधी वैभव सूर्यवंशीकडे असेल.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशक हुकले, पण...

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. एनिग्डीनं सलामीवीर यशश्वी जैस्वाल याला १२ धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास शो दाखवला. त्याने २१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकले, पण २१९ स्ट्राइक रेटसह धावा कुटत त्याने दिल्लीच्या गोलंदाजांना बॅकफुटवर ढकलेल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi: Teenager Becomes IPL's New Sixer King, Breaks Record

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 15, set a new IPL record for most sixes in a season, surpassing Abhishek Sharma. He hit 43 sixes in 12 matches, becoming the youngest 'Sixer King'. He is now chasing Chris Gayle's record.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सवैभव सूर्यवंशीअभिषेक शर्मा