Delhi Capitals won by 5 wkts vs Rajasthan Royals : अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी खेळवण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेतील ६२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना ५ विकेट्सनी जिंकत स्पर्धेतील आपली आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे सलग तिसऱ्या पराभवामुळे रियान परागच्या राजस्थान रॉयल्स संघासाठी प्लेऑफ्सचा मार्ग खडतर झाला असून प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट निर्माण झाले आहे. आता याचा फायदा कुणाला मिळणार ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीसह रियान-ध्रुवची दमदार फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी फिरल्यावर वैभव सूर्यवंशीनं २१ चेंडूत केल्लाय ४६ धावांच्या दमदार खेळीनंतर ध्रुव जुरेल ५४( ४०) आणि आणि कर्णधार रियान परागच्या ५१ (२६) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १९३ धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर १९४ धावांचे टार्गेट सेट केले होते.
IPL Record : किंग कोहलीला जमलं नाही ते KL राहुलनं करून दाखवलं! एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला
KL राहुल-अभिषेक पोरेलचं अर्धशतक, अक्षर पटेलनं आशुतोष शर्मानं संपवली मॅच
या धावांचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल आणि केएल राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६१ चेंडूत १०५ धावांची भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली. अभिषेक पोरेल ३१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. लोकेश राहुलनं ४२ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावंची खेळी केली. कर्णधार अक्षर पटेलनं १८ चेंडूत केलेल्या नाबाद ३४ धावा आणि आशुतोष शर्मानं ५ चेंडूत १८ धावांची नाबाद खेळी करत २० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरच दिल्ली कॅपिटल्सचा विजय निश्चित केला.
दिल्ली कॅपिटल्सची आस कायम; RR साठी धोक्याची घंटा
दिल्ली कॅपिटल्सचा संघ १३ सामन्यानंतर ६ विजयासह १२ गुणांची कमाई करून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. अखेरचा सामना जिंकून दिल्ली कॅपिटल्स संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यांचा आणखी एक विजय प्लेऑफ्सच्या शर्यतीत आणखी एक ट्विस्ट निर्माण करणारे ठरेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ १२ सामन्यातील ६ विजयासह १२ गुणांची कमाई करून पाचव्या स्थानावर आहे. अजूनही उर्वरित २ सामने जिंकून ते १६ गुणांपर्यत पोहचू शकतात. पण पराभावच्या हॅटट्रिकमुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. पुढचा एक सामना जरी गमावला तर ते दिल्ली कॅपिटल्ससोबत १४ गुणांवर येतील. हे चित्र या संघातील उर्वरित सामन्यानंतर ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळण्याचे संकेत देणारेच आहे.
Web Summary : Delhi Capitals defeated Rajasthan Royals, keeping their playoff hopes alive. Rajasthan suffered their third consecutive loss after strong batting performances from Suryavanshi, Jurel, and Parag. Rahul and Porel's partnership and Patel's finish sealed Delhi's victory.
Web Summary : दिल्ली कैपिटल्स ने राजस्थान रॉयल्स को हराकर प्लेऑफ की उम्मीदें जिंदा रखीं। सूर्यकुमारवंशी, जुरेल और पराग के अच्छे प्रदर्शन के बाद भी राजस्थान को लगातार तीसरी हार मिली। राहुल और पोरेल की साझेदारी और पटेल के शानदार अंत ने दिल्ली को जीत दिलाई।