Donald Trump China Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचीन दौऱ्याबाबत अजूनही फारसे बोलायला तयार नाहीत. इराण युद्धात (US Iran War) अमेरिका एकटा अडकून पडला आणि मित्र राष्ट्रांनी आपला हात युद्धातून काढून घेतला. अशा वेळी ट्रम्प यांना चीनची आठवण झाली. तीन दिवस ट्रम्प, त्यांचे तीन वरिष्ठ कॅबिनेट मंत्री आणि ३० अमेरिकन व्यावसायिक नेते बीजिंगमध्ये बैठका आणि चर्चा करत राहिले. पण या दौऱ्यातून अमेरिकेला सांगण्यासारखे काहीही मिळाले नाही.
युद्धात अडकून पडल्यावर अमेरिकेला चीनची आठवण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवस्था रिचर्ड निक्सन यांच्यासारखीच झाली. निक्सन हे व्हिएतनाम युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना चीनला गेले होते, तर ट्रम्प इराण युद्धात खोलवर गुंतले असताना चीनच्या दौऱ्यावर गेले. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून आपल्या अटींवर तोडगा काढण्यावर इराण ठाम होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना माहित होते की चीनच्या सहभागाशिवाय इराणचा हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांनी चीनचा दौरा केला, पण त्यांना ठोस असा तोडगा मिळू शकला नाही.
इराणच्या मुद्द्यावर चीनकडून ट्रम्प यांची निराशा
ट्रम्प दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांचा सूर जवळजवळ असा होता की जणू ते चीनवर उपकार करत आहेत. चीन दौऱ्यावर निघण्यापूर्वी ते म्हणाले होते की चीन इराणच्या पाठीशी उभा असून इराणच्या उद्दामपणामागे चीन हीच खरी शक्ती आहे. इराण युद्ध आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे मुद्दे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याच्या अजेंड्यावर अग्रस्थानी होते. जर चीनने इराणवर दबाव आणला असता, तर त्या बदल्यात ट्रम्प चीनला काय देऊ शकतील? हा प्रश्न होता. पण याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील याबाबत काहीच शब्द देण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ चीनची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. पण इराणच्या मुद्द्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांची घोर निराशाच केली.
चीनकडून अमेरिकेलाच कानपिचक्या
ट्रम्प यांच्या चीन भेटीदरम्यान जिनपिंग यांच्याकडे इराणवर दबाव आणण्याची अपेक्षा होती. पण जिनपिंग म्हणाले की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारला जाऊ नये आणि पर्शियन आखाताला रणांगण बनवू नये. चीनचा रोख अमेरिकेकडेच होता, ज्यांच्या नौदलाने इराणवर सागरी नाकेबंदी लादली. इराण आणि चीन यांच्यातील सामरिक मैत्री राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना संपवायची होती, पण ते सध्यातरी शक्य नसल्याचे आता स्पष्ट झाले. त्यामुळे ट्रम्प यांना दौऱ्यावर ना ठोस आश्वासन मिळाले, ना काही सांगण्यासारखे घडले.
Web Summary : Trump's China visit, aimed at addressing Iran tensions, yielded no concrete results. Seeking Chinese cooperation on Iran, Trump faced disappointment as China prioritized regional stability. The trip failed to secure any strategic advantage for the US.
Web Summary : ईरान तनाव को संबोधित करने के उद्देश्य से ट्रम्प की चीन यात्रा से कोई ठोस परिणाम नहीं निकला। ईरान पर चीनी सहयोग की तलाश में, ट्रम्प को निराशा का सामना करना पड़ा क्योंकि चीन ने क्षेत्रीय स्थिरता को प्राथमिकता दी। यात्रा अमेरिका के लिए कोई रणनीतिक लाभ हासिल करने में विफल रही।