Join us
Daily Top 2Weekly Top 5

RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?

पंजाबच्या सलामीवीरांसह कर्णधार अय्यरचा फ्लॉप शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 19:33 IST

Open in App

RCB Qualify For IPL 2026 Playoffs :  विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यरच्या दिमाखदार अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने धर्मशालाच्या मैदानात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का दिला. दिमाखदार कामगिरीसह गत चॅम्पियन बंगळुरुचा संघ १३ सामन्यांपैकी ९ सामने जिंकत १८ गुणांच्या कमाईसह यंदाच्या हंगामात प्लेऑफ्समध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सलग सहाव्या पराभवासह पंजाबच्या संघ संकटात सापडला आहे. आता साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकूनही त्यांना अन्य संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंग कोहलीसह व्यंकटेश अय्यरची वादळी खेळी

धर्मशाला येथील घरच्या मैदानात श्रेयस अय्यरने नाणेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरला. जेकब बेथल अवघ्या ११ धावांची भर घालून परतल्यावर विराट कोहलीनं ३७ चेंडूत ५८ धावांची दिमाखदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्याच्याशिवाय देवदत्त पडिक्कल याने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. कर्णधार रजत पाटीदारच्या दुखापतीमुळे व्यंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याने ४० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची नाबाद खेळी केली. टीम डेविडनं १२ चेंडूत केलेल्या २८ धावांच्या उपयुक्त खेळीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २२२ धावा करत पंजाब किंग्ससमोर २२३ धावांचे आव्हान ठेवले होते.

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

पंजाबच्या सलामीवीरांसह कर्णधार अय्यरचा फ्लॉप शो

या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्यला भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात शून्यावर माघारी धाडले. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या प्रभसिमरन सिंगला देखील भुवीनं २ धावावंवर चालते केले. सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर श्रेयस अय्यरकडून मोठी अपेक्षा होती. पण तो फक्त एका धावेची भर घालून रसिख सलामच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

शशांक सिंगनं अर्धशतक ठोकले, पण...

पंजाबच्या संघाकडून कूपर कॉलॉनी ३७ (२२), सूर्यांश शेडगे ३५ (२२) आणि मार्कस स्टॉयनिस ३७ (२५) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकालाही चांगली सुरुवात मिळाल्यावर मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात शशांक सिंह याने अर्धशतकी खेळी साकारली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : RCB Qualifies for IPL 2026 Playoffs; Punjab's Hopes Diminish

Web Summary : RCB secured an IPL playoff spot after defeating Punjab, fueled by Kohli and Iyer's half-centuries and Kumar's bowling. Winning nine of thirteen matches, RCB is the first team to qualify. Punjab faces uncertainty after their sixth consecutive loss.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स