शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 19:35 IST

बिहारच्या बेगुसरायमध्ये सायबर पोलिसांनी आर्थिक फसवणुकीशी संबंधित एका मोठ्या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.

बिहारच्या बेगुसरायमध्ये सायबर पोलिसांनी आर्थिक फसवणुकीशी संबंधित एका मोठ्या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संशयास्पद बँक खात्याबाबत देशभरातून तब्बल २०५ तक्रारी दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासात असं समोर आलं आहे की, गेल्या आठ महिन्यांत या खात्यातून १५ कोटी २५ लाख ३५ हजार ३०७ रुपयांचं फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाले आहेत.

सायबर डीएसपी इमरान अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खात्याविरुद्ध 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल' (NCRP) वर देशातील विविध राज्यांमधून अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सुनील कुमार असं आहे. पोलीस पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते आणि आता अचूक माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे बेगुसराय येथे गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस आता या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांचा शोध घेत आहेत. एका संशयास्पद खात्याबाबत देशभरातून सातत्याने तक्रारी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. सायबर पोलिसांनी या खात्याची कसून चौकशी केली आणि आठ महिन्यांच्या बँक स्टेटमेंटची छाननी केली, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा खुलासा झाला.

१५ कोटी २५ लाख ३५ हजार ३०७ रुपयांची फसवणूक

तपासात असं आढळून आलं की, एकूण १५ कोटी २५ लाख ३५ हजार ३०७ रुपयांची फसवणुकीची रक्कम या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून या खात्याविरुद्ध २०५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम शेकडो लोकांची फसवणूक करून या खात्यात पाठवण्यात आली होती. एकाच खात्याच्या माध्यमातून इतक्या मोठ्या रकमेची देवाणघेवाण झाल्याचं समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. यानंतर आरोपीचा घेण्यात आला.

आरोपीचे धक्कादायक खुलासे

अटकेनंतर झालेल्या चौकशीत आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले. सायबर गुन्हेगारांच्या सिंडिकेटला आपण हे बँक खातं ३,७५,००० रुपयांना विकलं असल्याची कबुली त्याने दिली आहे. आरोपीने चौकशीदरम्यान या रॅकेटशी संबंधित इतर तीन मास्टरमाइंडची नावंही पोलिसांना सांगितली आहेत. पोलीस आता हे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पुढील कारवाई करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber police bust fraudster: ₹15 crore swindle, 205 complaints.

Web Summary : Bihar police arrested a man after 205 complaints revealed a ₹15 crore fraud. The accused confessed to selling the bank account to cyber criminals for ₹375,000. Police are investigating the network and other involved masterminds.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा