Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 17:38 IST

1 / 11
सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर अनेकदा चर्चांना उधाण येतं. कधी-कधी काही अफवा इतक्या टोकाला जातात की, चाहत्यांना खरं आणि खोटं यातील फरकच समजत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि तिची मैत्रीण दिशा पाटनी यांच्यासोबत घडला आहे.
2 / 11
मौनी रॉयचा पती सूरज नांबियारसोबतचा संसार मोडला आहे. सुरुवातीला दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने त्यांच्यात बिनसल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.
3 / 11
मौनीने यानंतर स्टोरी शेअर करत 'बातम्या पसरवू नका आणि आम्हाला प्रायव्हसी द्या' अशी विनंती केली. तर दुसऱ्याच दिवशी तिने थेट घटस्फोटाचीच पोस्ट जाहीर केली.
4 / 11
याच दरम्यान सोशल मीडियावर एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. मौनीने सूरजपासून वेगळं झाल्यानंतर आता दिशा पाटनीशी लग्न केल्याचा मोठा दावा या पोस्टमध्ये केला जात आहे.
5 / 11
सोशल मीडियावर वेगाने शेअर होत असलेल्या या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि दिशा पाटनी एकमेकांसोबत दिसत असून दोघींच्या गळ्यात फुलांचे हार आहेत. या फोटोवर लिहिलेली कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
6 / 11
'आयुष्यातील एक चॅप्टर बंद केल्यानंतर, मला माझी आयुष्यभराची जोडीदार मिळाली आहे. होय... दिशा आणि मी या सुंदर लव्हस्टोरीला लग्नाच्या नात्यात बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. दुःखातून सावरण्यापासून ते आनंदापर्यंतचा हा प्रवास, आमचं 'फॉरएव्हर' आता सुरू होतंय' असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
7 / 11
व्हायरल पोस्टचं सत्य आता समोर आलं आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. तपासात समोर आलं आहे की, ही दिशाभूल करणारी पोस्ट असून फोटोवर मुद्दाम चुकीचं कॅप्शन देण्यात आलं आहे. दोघींचा हा फोटो जून २०२५ मधील आहे.
8 / 11
मौनी रॉय तिची बेस्ट फ्रेंड दिशा पाटनीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबत इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मंदिरात दोघींच्या गळ्यात हार घालण्यात आले होते, काही लोकांनी हाच फोटो एडिट केला. त्यानंतर लग्नाचं चुकीचं कॅप्शन दिलं.
9 / 11
अभिनेत्रीने आपल्या अधिकृत अकाउंटवरून अशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी दोघांनी एकत्र पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लिहिले की, 'आम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.'
10 / 11
'वैयक्तिक स्तरावर परस्पर सहमतीने आम्ही गोष्टी पुढे नेत आहोत. प्रायव्हसीसोबत आम्ही ही गोष्ट कशी हँडल करु शकतो याकडे आम्ही लक्ष देत आहोत. येत्या काळात आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहण्याचा प्रयत्न करू.'
11 / 11
मौनीने २०२२ साली बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केलं.गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्याआधी दोघं काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :मौनी राॅयदिशा पाटनीलग्नबॉलिवूडटिव्ही कलाकारघटस्फोटसोशल मीडियासोशल व्हायरल